लवकरच आपण सर्व २०२० वर्षाला अलविदा म्हणत २०२१ या नवीन वर्षाचे स्वागत करणार आहोत. २०२१ च्या स्वागतासाठी अनेक कलाकारांनी त्यांचे वेगवेगळे प्लॅन बनवले आहेत. कोणी पार्टी करणार आहेत तर कोणी सुट्या साजऱ्या करत आहेत. यातच एका मोठ्या सेलिब्रेशनची तयारी चालू असल्याच्या चर्चा होत आहे. ते सेलिब्रेशन आहे, रणबीर आणि आलियाच्या लग्नाचे. बॉलिवूडचे रोमँटिक कपल म्हणून ओळखले जाणारे रणबीर आणि आलिया लग्न करणार असल्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. या दोघांचेही काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहे. दोघेही त्यांच्या परिवारासोबत जयपूरला पोहचले आहेत. त्यावरूनच असा अंदाज लावला जात आहे की, ही दोघे लग्नासाठी जयपूरमध्ये आले आहेत. यात किती खरी माहिती आहे याबद्दल साशंकता आहे.
बॉलिवूडचे हॉट कपल म्हणून परिचित असणारे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ह्यांना नुकतेच एअरपोर्टवर बघण्यात आले. नितु कपूर, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग हे देखील एअरपोर्टवर त्यांच्यासोबत दिसले. तेव्हा लोकांना वाटले की, नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी जात असावे. मात्र ह्या सर्वाना जयपूर एअरपोर्टला बघून लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
Engagement smelling ???? "I want to tick mark that goal soon in my life", Ranbir Kapoor family are coming, Alia Bhatt's family too and Jaipur seems like a romantic destination, Priyanka Chopra was married there so… ^^ pic.twitter.com/5zQpvMcrcI
— Ashh-Loove ♡♡♡ (@AishRanliaLoove) December 29, 2020
या सर्वांचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाले असून लोकांनी या व्हिडिओंवर अनेक कमेंट करत प्रश्न विचारले आहेत. काहींनी विचारले की, आलिया, रणबीर यांचे लग्न कधी आहे? जयपूर मध्ये आहे का? तर काहींनी कमेंट केली की, सरतेशेवटी आलिया आणि रणबीर जयपूरमध्ये लग्न करत आहेत.
#RanbirKapoor & #AliaBhatt staying at hotel aman-i-khas at ranthambore, jaipur. pic.twitter.com/2PUii0ArUw
— Ranbir Kapoor Team (@RanbirKTeam) December 29, 2020
यासर्व गोष्टींमुळे आलिया, रणबीरच्या फॅन्समध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नुकतंच रणबीर कपूरने राजीव मसंद यांच्याशी बोलताना सांगितले होते की, ‘यावर्षी जर कोरोना नसता तर कदाचित आमचे लग्न झाले असते. कोरोनामुळे यावर्षी अनेक वाईट गोष्टी घडल्या.’
तर आलियाने एका मुलाखतीत सांगितले की, लग्नासाठी मी अजून खुप लहान आहे. लग्न नक्कीच करेन, मात्र योग्य वेळ आल्यावर.
#RanbirKapoor reached at Jaipur
With Ayan mukerjee and Alia BhattVideo: pic.twitter.com/OlNgDVG1zP
— Ranbir Kapoor Team (@RanbirKTeam) December 29, 2020
आता आलिया आणि रणबीरच्या लग्नाची बातमी कितपत खरी आहे हे लवकरच समजेल. तत्पूर्वी आलिया आणि रणबीर हे अयान मुखर्जीच्या ‘ब्रम्हास्त्र’ या सिनेमात एकत्र काम करत आहेत. यांच्यासोबत अमिताभ बच्चन देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार असून, हा सिनेमा २०२१ मध्ये प्रदर्शित होणार आहे.