Sunday, August 3, 2025
Home बॉलीवूड नव्याच्या सौंदर्यावर फिदा चाहता म्हणाला, ‘बॉलिवूडमध्ये ट्राय कर’; बिग बींच्या नातीने दिलं भन्नाट उत्तर

नव्याच्या सौंदर्यावर फिदा चाहता म्हणाला, ‘बॉलिवूडमध्ये ट्राय कर’; बिग बींच्या नातीने दिलं भन्नाट उत्तर

 

नव्याने नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा फोटो पाहून तिला खुप चांगल्या चांगल्या कमेंट्स येत आहे. नव्याने तिचा हसतानाचा एक फोटो शेअर केला असून, यात तिने गुलाबी रंगाचा टी-शर्ट घातला आहे. ज्यात ती अतिशय सुंदर दिसत आहे. हा फोटो पोस्ट करताना तिने सूर्यफुलाची ईमोजी पोस्ट केली आहे. या फोटोवर तिला एकाने कमेंट करत लिहिले की, “तू खूपच सुंदर दिसते, चित्रपटांमध्ये काम कर.” यावर तिने उत्तर देताना लिहिले, “तुमच्या या प्रेमळ शब्दांसाठी खूप धन्यवाद. मात्र सुंदर स्त्रिया बिजनेस देखील चालवू शकतात.” (Navya Nanda Reply To A Fan Who Asks You Are Beautiful Try Bollywood)

 

नव्याच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी देखील कमेंट्स केल्या आहेत. यात फोटोग्राफर रोहन श्रेष्ठने लिहिले, ‘कॅप्शन खूपच प्रेरणादायी आहे.’ महीप कपूरने हार्ट आणि सूर्यफुलाचे ईमोजी कमेंट्समध्ये पोस्ट केले आहे, तर ख़ुशी कपूरने हार्ट ईमोजी पोस्ट केले आहे.

श्वेता बच्चन आणि निखिल नंदा यांची मुलगी असलेल्या नव्याने अभिनयापेक्षा त्यांच्या फॅमिली बिजनेसमध्ये येऊन करिअर करण्याचे ठरवले आहे. नव्याने फोर्डहॅम विद्यापीठातून डिजिटल टेक्नोलॉजी आणि यूएक्स डिजाइनमध्ये पदवी संपादन केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एकेकाळी संजय दत्तवर प्रेम करायची माधुरी दीक्षित; मात्र अभिनेता जेल गेल्यानंतर बदललं सर्वकाही; असा होता ‘संजुबाबा’चा प्रवास

-अभिनेता ते साधूपर्यंत किस करण्यामुळे वादात राहिलीय शिल्पा शेट्टी; कोर्टाने जारी केला होता वॉरंट

-गौरीला ‘शक्ती : द पॉवर’मध्ये नव्हती आवडली शाहरुखची ओव्हर ऍक्टिंग; म्हणाली ‘सगळ्यात’ वाईट चित्रपट

हे देखील वाचा