मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री आणि डान्सर सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबत ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असते. सोनाली सध्या तिचा पती कुणालसोबत मालदीव मध्ये एन्जॉय करत आहे. तिने सोशल मीडियावर येथील अनेक फोटो शेअर केले आहेत. अशातच तिने काही हॉट फोटो शेअर केले आहेत.
सोनालीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक बिकिनी फोटो शेअर केला आहे. तिने मल्टी कलरची नॉटेड बिकिनी परिधान केली आहे. यात ती खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे. या फोटोमध्ये तिचा हात तिच्या पतीच्या हातात देऊन तिने हा अत्यंत सुंदर आणि बोल्ड फोटो काढला आहे. तिच्या या फोटोवर तिचे चाहते तसेच कलाकार वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. (Sonalee kulkarni’s bikini bold photo viral on social media)
सोनाली आणि कुणालने काही महिन्यांपूर्वी दुबईमध्ये अगदी साध्या पद्धतीने लग्न केले आहे. त्यांनी केवळ त्यांच्या परिवाराच्या उपस्थितीत हा समारंभ पार पाडला होता. त्यानंतर ते दोघे आफ्रिकेमध्ये हनिमूनला गेले होते. तेव्हा देखील तिने सगळे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. आता देखील त्यांच्या फोटोंना प्रेक्षक जोरदार प्रतिसाद देत आहेत.
सोनाली मराठी चित्रपट सृष्टीतील एक आघाडीची नायिका आहे. ती अभिनयासोबत उत्कृष्ट डान्स देखील करते. तिने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘महाराष्ट्राची डान्सिंग क्वीन’ हा रियॅलिटी डान्स शो जज देखील केला आहे. तिने ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘हिरकणी, ‘पोस्टर गर्ल्स’, ‘क्लासमेट’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-लाजुन लाल झाला शाहिद कपूर, जेव्हा मीराने शेअर केले बेडरूम सिक्रेट; म्हणाली, ‘मला वाटतं तो कंट्रोल…’










