हिंदी सिनेमांचा आत्मा म्हणजे त्या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री. सिनेमाच्या कथेच्या मागणीनुसार जर अभिनेत्रींची गरज नसेल, तरी त्यांना कुठे ना कुठे कमी काळासाठी का असेना घेतले जाते. अभिनेत्रींमध्ये प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत आणण्याची ताकद असते. म्हणूनच अभिनेत्री सर्वात जास्त महत्वाच्या असतात. या अभिनेत्री त्यांच्या सौंदर्यामुळे खूप प्रकाशझोतात असतात. मात्र मागील काही काळापासून अभिनेत्रींमध्ये प्लास्टिक सर्जरीचे खुळ खूपच मोठ्या प्रमाणात घुसले आहे. आजपर्यंत अनेक अभिनेत्रींनी त्यांची सर्जरी करून त्यांचे सौंदर्य अधिक वाढवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. या प्रयत्नात सर्वच हिरोइनला यश मिळते असे नाही. काही अभिनेत्रींची सर्जरी फसली देखील आहे. यात आयेशा टाकिया, वाणी कपूर, शिल्पा शेट्टी, अनुष्का शर्मा, करिश्मा कपूर, प्रियांका चोप्रा, कॅटरिना कैफ, कोयना मित्रा, श्रीदेवी, रेखा, बिपाशा बासू अशा अनेक अभिनेत्रींनी सर्जरी केली आहे. यात अनेक जुन्या आणि नवीन अशा सर्वच अभिनेत्रींचा समावेश आहे.
https://www.instagram.com/p/CRmD4BEgGpY/?utm_source=ig_web_copy_link
यात आता अभिनेत्री नर्गिस फाखरीचा देखील समावेश झाला आहे. रॉकस्टार फेम अभिनेत्री नर्गिसने नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ती जरा वेगळीच दिसत आहे. तिने तिचा पोस्ट केलेला फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. सध्या नर्गिस तिच्या बॉयफ्रेंडसोबत इटलीमध्ये सुट्यांचा आनंद घेत आहे. या सुट्यांचे अनेक फोटो शेअर करत, तिचा एक ट्रान्सफॉर्मेशनचा फोटोसुद्धा शेअर केला आहे. हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. कारण प्लास्टिक सर्जरीमुळे ती खूपच वेगळी दिसत आहे. तिने तिच्या मेकअपचे क्रेडिट मलिहा खानला दिले आहे.
https://www.instagram.com/p/CR-MRYFjVsE/?utm_source=ig_web_copy_link
तिला तिच्या या फोटोवर अनेक निगेटिव्ह कमेंट्स येत आहे. तिच्या फोटोमध्ये तिने लाल रंगाची लिपस्टिक लावल्यामुळे तिचे ओठ हायलाइट होत आहे. लोकांनी तिचा हा लूक साफ नाकारला आहे. या फोटोमध्ये ती लाल लिपस्टिक, ब्लॉन्ड हेयर फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तिच्या या फोटोंवर अनेक कमेंट्स येत आहे.
एकाने लिहिले, ‘ही मुलगी प्लॅस्टिक सर्जरीआधी चांगली दिसत होती. मला आश्चर्य वाटते की, असे करायच्या वेळेस तिच्या डोक्यात काय चालू होते.’, अजून एकाने लिहिले, ‘तू डोनाल्ड डक दिसत आहेस.’ अजून एक म्हणतो, ‘बेकार दिसत आहेस.’ नर्गिसचा हा बदललेला लूक कोणालाच आवडला नाहीये. तिला सर्वच नकारात्मक कमेंट्स आल्या आहेत. याआधी देखील नर्गिसने प्लॅस्टिक सर्जरी केली असल्याचे बोलले जात होते.
https://www.instagram.com/p/CR9sZ3sFQ3Z/?utm_source=ig_web_copy_link
नर्गिसने ‘रॉकस्टार’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. त्यानंतर ती काही मोजक्या चित्रपटांमध्ये दिसली, मात्र तिचे करियर हिट झाले नाही.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-लाजुन लाल झाला शाहिद कपूर, जेव्हा मीराने शेअर केले बेडरूम सिक्रेट; म्हणाली, ‘मला वाटतं तो कंट्रोल…’