Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘सॉरी अम्मा- अब्बा, नाक कापले मी’, म्हणत साराने का मागितली सैफ अन् अमृताची माफी?

खूप कमी वेळेत नवाब कुटुंबातील मुलगी सारा अली खान हिने चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. साराने २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केदारनाथ’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटाने म्हणावे तसे यश मिळवले नसले, तरीही सारा चाहत्यांच्या मनात आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाली. चित्रपटांप्रमाणेच सोशल मीडियावर सुद्धा सारा नेहमीच सक्रिय असते. तिथे सुद्धा सारा आपल्या जोक्सने आणि अनोख्या अदाकारीने दर्शकांचे मनोरंजन करण्यासाठी ती कधीच चुकत नाही. पुन्हा एकदा सारा चर्चेत आली आहे.

ते असं की, नुकताच साराने एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ मध्ये सारा तिचे आई- वडील सैफ अली खान आणि अमृता सिंगची माफी मागत आहे. इतकंच नाही, तर साराने हे सुद्धा सांगितले की, मी नाक कापलं. नेमका हा प्रकार काय आहे? साराने आई- वडिलांची माफी का मागितली? चला तर जाणून घेऊया…

साराने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिच्या नाकावर जखम झालेली दिसत आहे. म्हणून या व्हिडिओला कॅप्शन देत लिहिले की, “सॉरी अम्मा, अब्बा और इग्गी, नाक काट दी मैंने.” साराचा व्हिडिओ आणि त्याच्या सोबतचे कॅप्शन पाहून साराचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. नाक कापलं यावरून साराचे असे म्हणणे होते की, नाकाला जखम झाली. या गोष्टीला साराने तिच्या मजेशीर अंदाजात सांगितलं आहे.

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, साराने आधीच नाकाला झाकलेले आहे आणि काही क्षणातच ती तिच्या नाकावरून कॉटन बाजूला करते, तेव्हा नाकाला जखम झालेली दिसते. ज्यातून रक्त बाहेर येताना दिसत आहे. साराचा हा व्हिडिओ खूप मजेदार असला, तरीही तिच्या चाहत्यांनी त्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

महत्वाचे की, सारा अली खान सोशल मीडियावर सक्रियच नाही, तर यावर तिचा मोठा चाहतावर्ग सुद्धा आहे. सारा जी पण पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर करते ती लगेच व्हायरल होते. इंस्टाग्रामवर सारा अली खानचे ३३ मिलियन पेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत आणि दिवसेंदिवस ते वाढतच जात आहेत.

सन २०१८ साली आलेल्या ‘ केदारनाथ ‘ या चित्रपटातून सारा ने आपल्या करियर ची सुरुवात केली. या चित्रपटात ती दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत सोबत झळकली होती. याबरोबर साराने इम्तियाज अलीचा चित्रपट ‘लव आज कल’ मध्ये कार्तिक आर्यनसोबत काम केले. साराच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं, तर ती लवकरच ‘अतरंगी रे’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती अक्षय कुमार आणि दाक्षिणात्य अभिनेता धनुषसोबत काम करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आता होणार धमाल! प्रेक्षकांचे मनोरंजन करायला ‘या’ पाच मालिका सज्ज; लवकरच झी मराठीवर मारणार दणक्यात एंट्री

-अथिया शेट्टीच्या पोस्टवर अनुष्काने ‘त्या’ गोष्टीवर निशाणा साधत केली भन्नाट कमेंट

-शिवानी सोनारला वाढदिवसाच्या आधीच मिळाले ‘हे’ गिफ्ट, पाहून तुम्हीही कराल अभिनंदन

हे देखील वाचा