Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

एकेवळी नानांच्या सिनेमाबरोबरच ‘या’ दोन अभिनेत्रींबरोबच्या अफेअरच्या चर्चाही होत्या जोरात

बॉलिवूड कलाकाराचं लग्न, त्यांची अफेअर्स आणि त्यांचे विवाहबाह्य संबंध हे कुणापासूनही लपून राहत नाहीत. माध्यमं सतत या कलाकारांच्या मागे फिरत असतात. कारण यात त्यांना हवा असलेला मसाला असतो. असो आज नाना पाटेकर यांचा ७० वा वाढदिवस आहे. त्यांच्या या वाढदिवसाबद्दल आपण एका वेगळ्या गोष्टीबाबत चर्चा करणार आहोत. आपल्याला ठाऊक आहे का की नाना पाटेकर यांचे एक नाही तर दोन दोन अभिनेत्रींसोबत विवाहबाह्य संबंध असल्याची चर्चा होती. बसला ना धक्का! चला आज आपण याच बाबतीत जाणून घेणार आहोत.

नाना पाटेकर यांचा जन्म १ जानेवारी १९५१ साली रायगड जिल्ह्यात झाला. सुरुवातीच्या काळात नानांना जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. इथपर्यंत की काही रुपये मिळवण्यासाठी त्यांना सिनेमाचे पोस्टर रंगवावे लागत असत. यानंतर त्यांच्या कुटुंबाने मुंबई गाठली. नाना पाटेकर यांनी सर जेजे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट, मुंबई येथून शिक्षण पूर्ण केले. नाना पाटेकर एक अभिनेता तसेच लेखक आणि चित्रपट निर्माते आहेत. नानांना अनेक वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. इतकंच नव्हे तर त्यांना पद्मश्री सन्मानानेही गौरविण्यात आले आहे. नाना पाटेकर आपल्या चित्रपट कारकिर्दीसोबतच त्यांच्या अफेअर्सविषयी देखील चर्चेत होते.

नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांच्यातील अफेयर कुणापासून लपून राहिलेलं नव्हतं… मनीषा आणि नाना यांनी ‘खमोशी द म्युझिकल’, ‘अग्निसाक्षी’ आणि ‘युगपुरुष’ असे अनेक चित्रपट एकत्र केले. दोघांच्याही वयामध्ये वीस वर्षांचं अंतर होतं. नानांचं आधीच लग्न झालं होतं आणि असं असूनही, ते मनीषाकडे आकर्षित झाल्याची वृत्त तेव्हा येत होती.

असं म्हणतात की त्यावेळी नाना पाटेकर आणि त्यांची पत्नी निलकांती यांच्यात काहीही सुरळीत नव्हतं, म्हणूनच निलकांती त्यांच्यापासून वेगळ्या राहत होत्या. एका मुलाखतीत नानांनी स्वत: सांगितले होतं की ‘खामोशी’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ते मनीषाला भेटले. यादरम्यान दोघांनी एकमेकांना चांगल्या प्रकारे समजण्यास सुरुवात केली आणि त्यांचं नातं आणखीनच घट्ट झालं. या चित्रपटात नाना पाटेकर यांनी मनीषाच्या वडिलांची भूमिका साकारली होती.

जिथे प्रेम असतं तिथे भांडण हे होतंच! या नात्यात देखील वाद होते… नाना पाटेकर मनीषाबद्दल खूप पझेसिव्ह होते. मनीषा शूटिंगसाठी लहान कपडे घालून आली तर नाना पाटेकर तिला सेटवर ओरडत असत. ‘युगपुरुष’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मनीषा आणि नाना पाटेकर यांच्यातील वाद वाढले.

मनीषाला नाना पाटेकर यांच्याशी लग्न करायचं होतं, पण नानांना पत्नी नीलकांतीशी घटस्फोटही घ्यायचा नव्हता. एक दिवस अभिनेत्री आयशा जुल्कासोबत नाना पाटेकर यांना पाहिल्यावर मनीषाचे नाना पाटेकर यांच्याशी असलेले सर्वच संबंध संपुष्टात आणल्याची वृत्तही तेव्हा आली होती.

माध्यमांतील काही वृत्तांनुसार मनीषा कोईरालाने नाना पाटेकर यांना आयशासोबत रोमांस करताना पकडलं होतं. या वेळी मनीषा आणि आयशामध्ये जोरदार भांडणही झालं. नाना पाटेकर यांनी आयशा झुल्कासोबत ‘आंच’ चित्रपटात काम केलं होतं. मनीषाबरोबरचे संबंध संपल्यानंतर नानांनी आयशा झुल्कासोबतचं नातं माध्यमांसमोर उघड केलं होतं.

आयशा झुल्काबरोबर ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्येही राहिले होते. आयशा आणि नाना पाटेकर यांचे हे नातं बरीच वर्षे चालू राहिलं, पण एक दिवस स्टेज प्ले दरम्यान हे नातं पूर्णपणे संपलं, स्टेजवर नानांनी जाहीरपणे आयशाचा अपमान केला आणि तिच्यावर हात उगारला होता. त्यानंतर आयशा पुन्हा कधीच नानांच्या आयुष्यात आली नाही.

काय मंडळी! वाचून डोकं चक्रावलं असेल ना! आपल्याकडे म्हणतात ना ‘दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं!’ हेच खरं…

हे देखील वाचा