Saturday, August 29, 2026
Home अन्य आदर्श सूनबाई! सासऱ्यांची तब्येत सुधारल्यानंतरच अभिनेत्री दीपिका कक्करने साजरा केला स्वतःचा वाढदिवस

आदर्श सूनबाई! सासऱ्यांची तब्येत सुधारल्यानंतरच अभिनेत्री दीपिका कक्करने साजरा केला स्वतःचा वाढदिवस

टीव्ही इंडस्ट्रीमधील आणि सोशल मीडियावरील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध असणारे कपल म्हणजे दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम. फॅन्समध्ये हे दोघं तुफान लोकप्रिय आहेत. दीपिका आणि शोएब नेहमी त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. तिचे एक यूट्यूब चॅनेल देखील आहे. टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय सून असणाऱ्या दीपिकाने तिच्या अभिनयाने आणि तिच्या अंदाजने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

नुकताच दीपिकाने तिचा ३५ वा वाढदिवस साजरा केला. ‘ससुराल सिमर का’ फेम दीपिकाने मात्र यावर्षी तिचा वाढदिवस साजरा केला नाही. तिचा पती शोएब इब्राहिमच्या वडिलांना काहीच दिवसांपूर्वी ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. याच कारणामुळे दीपिका आणि तिचा संपूर्ण परिवार काळजीत असल्याने तिने तिच्या सासऱ्यांची तब्येत बरी झाल्यावरच वाढदिवस साजरा करणार असल्याचे सांगितले होते.

मात्र आता सुदैवाने तिच्या सासऱ्यांची तब्येत पूर्णपणे ठीक होत असल्याने दीपिकाने हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्यासोबत तिचा वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सासऱ्यांची तब्येत ठिक होत असल्याने, तिचा वाढदिवस साजरा करताना त्या सर्वांचा आनंद द्विगुणित झाला होता. तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो दीपिकाचा पती आणि अभिनेता शोएबने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दीपिकाने केक कापला असून, तिच्या सासऱ्यांना तिने केक खाऊ घातला. शिवाय या व्हिडिओमध्ये तिच्या चेहऱ्यावर देखील केक लावलेला दिसत आहे. तिच्या सासऱ्यांनी तिला केक खाऊ घालून आशीर्वाद दिले. या व्हिडिओमध्ये दीपिका अगदी मालिकेमध्ये जशी सून दिसते, तशीच खऱ्या आयुष्यात आहे याचे उदाहरण देखील पाहायला मिळाले आहे. सासऱ्यांनी केक खाऊ घातल्यानंतर दीपिकाने लगेचच त्यांचे हात टिशू पेपरने पुसले.

दीपिकाबद्दल तिच्या कुटुंबातील सर्व लोकं भरभरून बोलताना दिसतात. ती अगदी आदर्श आणि मालिकेत दाखवणाऱ्या सूनेसारखीच सून असल्याचे नेहमी सांगितले जातात. दीपिका आणि शोएबची भेट ‘ससुराल सिमर का’ या मालिकेदरम्यान झाली. त्यानंतर या दोघांनी २०१९ साली लग्न केले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-इंडियन आयडलच्या ‘या’ स्पर्धकाचे फळफळले नशीब, करण जोहरकडून मिळाली थेट ‘धर्मा’साठी गाणी गाण्याची संधी

-अफेअरच्या चर्चांमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने कियाराला रस्त्यावरच घेतले उचलुन, पुढे जे झाले…

-रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी बेडरेस्टवर आहे नुसरत भरुचा; ‘या’ कारणामुळे अचानक बिघडली होती तब्येत

हे देखील वाचा