Saturday, May 2, 2026
Home मराठी तेजस्विनी पंडितचा कूल लूक आला समोर, पुन्हा एकदा पाहायला मिळाली अभिनेत्रीची ‘हटके’ स्टाइल

तेजस्विनी पंडितचा कूल लूक आला समोर, पुन्हा एकदा पाहायला मिळाली अभिनेत्रीची ‘हटके’ स्टाइल

आपल्या सालस आणि सोज्वळ सौंदर्याने प्रत्येकाच्या मनावर राज्य करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. टीव्ही मालिकांमधून ती घराघरात पोहचली आणि प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आपलं एक अढळ स्थान निर्माण केले. ‘तुझं नी माझं घर श्रीमंताचं’ स्टार प्रवाहवरील या लोकप्रिय मालिकेने तेजस्विनीला चांगलीच ओळख दिली.

अनेक मराठी टीव्ही मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून आपण तेजस्विनीला साध्या आणि सोज्वळ भूमिकेत पाहिले आहे. पण तिचा कूल डॅशिंग लूक कसा असेल याचा कोणी विचार तरी केला आहे का? तेजस्विनीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही डॅशिंग फोटो शेअर केले आहेत. जे पाहून तिच्या चाहत्यांचे अक्षरशः डोळे फिरले आहेत. (marathi actress tejaswini pandit’s cool dashing look viral on social media )

तेजस्विनीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने राखाडी रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाची पँट परिधान केली आहे. तसेच तिने डोक्यावर राखाडी रंगाची टोपी घातली आहे. ती भिंतीला टेकून पोझ देताना दिसत आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “तिला माहित आहे की ती कोण आहे, कारण तिला माहित आहे की ती कोण नाही.” तिचे अनेक चाहते या फोटोवर कंमेंट करत आहे.

तेजस्विनीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटात खलनायिकाची भूमिका निभावली होती. त्यानंतर तिने ‘रखेली’ या नाटकात काम केले. तिला ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटातून खूप ओळख आणि लोकप्रियता मिळाली. तसेच तिने ‘तू ही रे’ या चित्रपटात काम करून सगळीकडे आपली ओळख निर्माण केली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काय सांगता ‘जेह’ सैफ करीनाच्या मुलाचे खरे नाव नाही? मग काय आहे त्याचे नाव? जाणून घ्या

-अभिनव शुक्ला ‘या’ आजाराने आहे ग्रस्त, तर आजार स्वीकारण्यास लागली तब्बल २० वर्षे

-बिग बॉसच्या घरात शमिता शेट्टीच्या पुनरागमनाने प्रेक्षकांमध्ये पसरली नाराजी; युजर्स म्हणतायेत, ‘टीआरपीसाठी…’

हे देखील वाचा