Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

रिया चक्रवर्तीने केला ग्लॅमरस फोटो शेअर; नेटकरी म्हणाले, ‘तू पुढे जात राहा, आम्ही…’

दिवंगत अभिनेता सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीसाठी २०२० हे वर्ष खूपच वाईट ठरले. गेल्या वर्षी झालेल्या बऱ्याच गोंधळानंतर रियाने पहिल्यांदाच इंस्टाग्रामवर सकारात्मक पोस्ट करण्यास सुरवात केली आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना तिच्या आयुष्यातील सर्व गोष्टी शेअर करत असते. रिया तिच्या भूतकाळातून स्वत:ला सावरण्याचा खूप प्रयत्न करत आहे. तिने नुकताच तिच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवर एक नवीन फोटो शेअर केला आहे.

नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये रिया अतिशय ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. तिने फोटोमध्ये एक अतिशय सुंदर लेहंगा परिधान केला आहे. हटके पोझ देऊन रियाने फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रिया गेल्या वर्षी २०२० मध्ये सोशल मीडियावर फारशी सक्रिय नव्हती. पण आता ती अधिक सक्रिय झाली आहे.

रिया तिच्या चाहत्यांसाठी दिवसेंदिवस नवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत राहते. अनेक युजर्स पोस्टवर प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने लिहिलं, “रिया तू पुढे जात राहा, आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोत.” दुसऱ्या चाहत्याने म्हटले, “तू खूप सुंदर आहेस. देव तुला नेहमीच आशीर्वाद देईल.” एका चाहत्याने सांगितलं, “होय, आम्हाला तुझ्याकडून खूप काही ऐकायचं आहे. तू सतत स्वत:वर लक्ष केंद्रित कर.”

रिया गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना तिच्या आयुष्याची झलक दाखवत आहे. रियाचे गेल्या काही दिवसांत अनेक व्हिडिओ प्रसिद्ध झाले आहेत. २०२० मध्ये तिचा बॉयफ्रेंड सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी रियावर अनेक आरोप करण्यात आले होते.

रिया आणि तिच्या कुटुंबियांविरूद्ध सुशांत सिंगच्या वडिलांनी गुन्हा दाखल केला होता. रियाची ईडी, सीबीआय आणि एनसीबीने चौकशी केली होती आणि अंमली पदार्थांशी संबंधित प्रकरणात तिला काही दिवस तुरुंगात राहावे लागले होते. काही दिवसांनी तिची सुटका करण्यात आली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रूबीना दिलैकच्या नवीन गाण्याला भरभरून प्रतिसाद; अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत मानले चाहत्यांचे आभार

आनंदाची बातमी! अभिनेत्री नयनताराने केली साखरपुड्याची पुष्टी; जाणून घ्या कोण आहे तो नशीबवान?

सोनू अभिनेत्रीसोबत करत होता ‘तुम तो ठहरे परदेसी’ गाण्यावर डान्स; मध्येच आला चाहता आणि…

हे देखील वाचा