नुकतेच बिग बॉसचे ओटीटी पर्व सुरु झाले. जेव्हा या ओटीटी बिग बॉसची घोषणा झाली तेव्हा याबद्दल अनेक चर्चा रंगल्या. कसे असेल?, कोण होस्ट करेल?, स्पर्धक कोण असतील? आदी अनेक प्रश्न आपल्या सर्वांना पडले होते, मात्र जेव्हा समजले की करण जोहर हा शो होस्ट करेल तेव्हा सर्वांना जरा नवलच वाटले. कारण मागील अनेक वर्षांपासून सलमान खान हाच या शोचा सूत्रसंचालक आहे. किंबहुना बिग बॉस शोची ओळखच सलमान झाला आहे. त्यामुळे सर्वाना करण जोहर पचनी पडायला वेळ लागतो की काय असे वाटले. काहींनी तर सलमान नाही म्हणून बिग बॉस बघणार नाही असे देखील ठरवले.
आता जेव्हा ओटीटी बिग बॉस सुरु झाले आहे तेव्हा करण जोहर आणि सलमान खान यांच्यात सर्वात चांगला होस्ट कोण? यावर वाद रंगताना दिसत आहे. सोशल मीडियावर याबद्दल प्रत्येक जणं त्यांची मतं मांडत असताना, बिग बॉसची माजी स्पर्धक असलेल्या मॉडेल सोफिया हयातने सलमानच्या होस्टींगवर तिचे काही मतं मांडली आहेत. सोफियाने बिग बॉसच्या ७ व्या पर्वात वाइल्डकार्डने प्रवेश केला, पण ती काही आठवड्यातच बाहेर पडली. (sofia hayat tells salman khan is not a good host for bigg boss)
सोफियाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्टमध्ये सांगितले की, “मी आताच बिग बॉसचे भाग बघायला सुरुवात केली. हे भाग मी आधी कधीच पाहिले नव्हते. अरमानसोबत जे झाले ते पाहून मी विसरून गेले की, मला या शोमध्ये किती मजा आली होती. आता मी हे देखील पाहू शकते की काही स्पर्धक किती चलाख होते आणि मी किती भोळी. हा एक खेळ आहे, पण असे असूनही हे विसरायला नको की, खेळ खेळताना तुम्ही इतरांना दुखवत तर नाही ना? मी तर असे पण नाही करू शकली.”
सोफियाने पुढे लिहिले, “मला आठवते की, जेव्हा मी घरात होती, तेव्हा या शोमध्ये मी सर्वात वाईट दिसत होती. याचे कारण म्हणजे सलमानने मला माझ्या ओठांवरून आणि माझ्या शरीरावरुन बोलल्यामुळे माझ्यात खूप वाईट भावना निर्माण झाली. मी लहान असताना मला माझ्या लूकवरून चिडवले जायचे, कुरूप, जाड म्हटले जायचे. जेव्हा सलमानने माझा अपमान केला तेव्हा मी खूपच जास्त प्रभावित झाले. आज एक जागरूक व्यक्तीच्या रूपात मी त्या व्यक्तीसाठी खेद व्यक्त करते. चला तर मग एका नवीन बिग बॉसची निर्मिती करू, जिथे मस्ती, खेळ बाबी हसण्यासोबतच लोकांना त्यांच्याबद्दल सकारात्मक भावना दिली जाईल. मला विश्वास आहे की, करण जोहर नक्कीच असे करू शकतो. ”
यासोबतच तिने सांगितले आहे सलमान खूप ओव्हर रिऍक्ट करतो. तर करणला स्वतःला लोकांसमोर प्रेझेंट करता येते. जर करण पुढेही बिग बॉस होस्ट करत असला तर तिला पुन्हा या शोमध्ये यायला आवडेल.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–आनंदाची बातमी! अभिनेत्री नयनताराने केली साखरपुड्याची पुष्टी; जाणून घ्या कोण आहे तो नशीबवान?
–सोनू अभिनेत्रीसोबत करत होता ‘तुम तो ठहरे परदेसी’ गाण्यावर डान्स; मध्येच आला चाहता आणि…
–मालदिवला नवऱ्यासोबत सुट्यांसाठी जात सना खानने एअरपोर्टवरच अदा केला नमाज; इंटरनेटवर व्हिडिओ व्हायरल










