Tuesday, June 10, 2025
Home मराठी तेजश्री प्रधानने लाल रंगाची साडी नेसून वेधले नेटकऱ्यांचे लक्ष; फोटोवर उमटतायेत जोरदार प्रतिक्रिया

तेजश्री प्रधानने लाल रंगाची साडी नेसून वेधले नेटकऱ्यांचे लक्ष; फोटोवर उमटतायेत जोरदार प्रतिक्रिया

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक अभिनेत्री आहेत. पण काही अभिनेत्री या अशा असतात ज्या त्यांच्या एखाद्या पात्रासाठी एवढ्या प्रसिद्ध असतात की, त्याच पात्राची ओळख त्यांना आयुष्यभर पुरते. अशीच अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील आपल्या सगळ्यांची जान्हवी. या एकाच पात्राने तिला भरभरून प्रेम दिले. या नंतर ती खूपच चर्चेत आली होती. तसेच तिने यानंतर अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटात काम केले होते. तेजश्री तिच्या सौंदर्यामुळे देखील चांगलीच चर्चेत आहे. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ती नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते. अशातच तिने तिचा एक फोटो शेअर केला आहे. जो सध्या जोरदार चर्चेत आला आहे. (tejashri pradhan share her red saree photo on instagram)

तेजश्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने लाल रंगाची साडी परिधान केली आहे. पांढऱ्या रंगाची बॉर्डर असलेली ही साडी देखील खूप सुंदर दिसत आहे. तिने यावर लाल रंगाचा स्लिव्हलेस ब्लाउज परिधान केलेला आहे. तिने कोणतीही ज्वेलरी परिधान केली नाही, केवळ बिंदी लावलेली दिसत आहे. तसेच हलकासा मेकअप केला आहे. हातात अंगठी घातलेली दिसत आहे. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. सगळेजण तिच्या या फोटोवर कमेंट करून तिच्या या लूकचे कौतुक करत आहेत. तसेच गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकर हिने देखील कमेंट केली आहे. तिने ‘सो प्रिटी’ अशी कमेंट केली आहे. तिचा हा फोटो मोठया प्रमाणात व्हायरल होत आहे.

तेजश्री ही अत्यंत आघाडीची अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमध्ये तसेच चित्रपटात काम केले आहे. तिने ‘बबलू बॅचलर’, ‘असेही एकदा व्हावे’, ‘ती सध्या काय करते’, ‘लग्न पाहावे करून’, ‘झेंडा’, ‘ओली की सुकी’, ‘शर्यत’, ‘हजारी २०२०’ यासारख्या चित्रपट काम केले आहे. तसेच तिने ‘लेक लाडकी या घरची’ आणि ‘अगंबाई सासूबाई’ या मालिकेत काम केले आहे. या मालिकेतील तिचे शुभ्रा नावाचे पात्र देखील चांगलेच गाजले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-या वीकेंडलाही ‘सुपर डान्सर’मध्ये शिल्पा शेट्टी गैरहजर; पण जॅकी अन् संगीताची जोडी लावणार ‘चार चाँद’

-आर माधवनसोबत विमानात पहिल्यांदाच घडले ‘असे’ काही; अभिनेत्याचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

-युरोप फिरून ५ महिन्यानंतर मायदेशी परतली परिणीती चोप्रा; म्हणाली, ‘आपल्या घरासारखे…’

हे देखील वाचा