Thursday, April 23, 2026
Home कॅलेंडर नव्याकोऱ्या वर्षात नवेकोरे स्टार! सुहानापासून अगस्त्य नंदापर्यंत ‘हे’ स्टार किड्स करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

नव्याकोऱ्या वर्षात नवेकोरे स्टार! सुहानापासून अगस्त्य नंदापर्यंत ‘हे’ स्टार किड्स करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

मागील वर्ष बॉलिवूडसाठी खूप खराब गेले. सुरुवातीचे दोन तीन महिने सोडले तर नवीन चित्रपटांच्या प्रदर्शनाची वेळच आली नाही. कोरोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे अनेक प्रदर्शनसाठी तयार असलेले चित्रपट रखडले गेले. त्यामुळेच बॉलिवूडमध्ये प्रदर्शनासाठी तयार असणाऱ्या स्टार्स किड्सचे पदार्पण देखिल लांबले आहे. बॉलिवूडमध्ये अनेक लोकप्रिय स्टार्स कीड आहे ज्यांचे पदार्पणाआधीच सोशल मीडियावर तगडे फॅन फॉलोविंग आहे, त्या सर्व स्टार किड्सच्या फॅन्सला त्यांच्या बॉलिवूडमधील एन्ट्रीबाबत खूप उत्सुकता आहे.

आता हळूहळू सर्व सुरु होत आहे. त्यामुळे लवकरच चित्रपटगृह देखील पूर्णपणे चालू होतील आणि मागच्या वर्षी पासून प्रदर्शनाची वाट पाहणारे सिनेमे प्रदर्शित होतील. यांच सिनेमातून काही स्टार कीड बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे, तर काही नवीन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये येतील. ह्यावर्षी २०२१ मध्ये कोणकोणते स्टारकिड बॉलिवूडमध्ये एन्ट्री करू शकतात पाहूया अशाच काही कलाकारांची नावे.

आर्यन खान :

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकतो. आर्यन हा बॉलिवूडमधल्या अनेक पार्ट्यांमध्ये दिसत असतो, शिवाय त्याचे सोशल मीडियावरही जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. आधी देखील अनेक वेळा आर्यनच्या बॉलिवूडमधल्या पदार्पणाच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र ह्यावर्षी तो नक्कीच पदार्पण करेल असे बोलले जात आहे. आर्यनने २०१९ मध्ये आलेल्या ‘द लायन किंग’ या सिनेमातील ‘सिम्बा’ या पात्रासाठी आवाज दिला होता. तर शाहरुख याने ‘मुसाफा’ साठी आवाज दिला होता.

अहान पांडे :

अभिनेत्री अनन्या पांडेचा चुलत भाऊ आणि अभिनेता चंकी पांडेचा पुतण्या अहान पांडे यावर्षी बॉलिवूडमध्ये एन्ट्री करू शकतो. प्राप्त माहितीनुसार अहान पांडे यशराजच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकतो.

अगस्त्य नंदा :


महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू आणि श्वेता बच्चन नंदा हिचा मुलगा अगस्त्य ह्यावर्षी बॉलिवूडमध्ये एन्ट्री करू शकतो असे जाणकारांचे म्हणणे आहे. अगस्त्य करण जोहरच्या चित्रपटातून एन्ट्री करू शकतो कारण अगस्त्य नुकताच करण जोहरसोबत एका पार्टीत दिसला होता.

सुहाना खान :

शाहरुख खानची लेक सुहाना खान देखील आर्यन खानसारखी ह्याचवर्षी बॉलिवूडमध्ये एन्ट्री करू शकते. सुहानाचे सोशल मीडियावर भरपूर फॅन फॉलोविंग असून ती तिचे अनेक बोल्ड फोटोज शेयर करत असते. काही दिवसांपूर्वी सुहानाने तिची शॉर्ट फिल्म ‘द ग्रे पार्ट ऑफ ब्लू’ यामधून तिच्या अभिनयाची झलक दाखवलीच आहे.

शनाया कपूर :

अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर तिची जिवलग मैत्रीण अनन्या पांडे सारखे लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते. शानयाने जान्हवी कपूरच्या ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ या चित्रपटासाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

खुशी कपूर

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची दुसरी मुलगी ख़ुशी कपूर लवकरच तिची बहिणीच्या पावलावर पाऊल टाकत अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करू शकते. ख़ुशी देखील तिची आई इतकीच सुंदर असून ती सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे.ख़ुशी अनेक कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्ये दिसत असते.

 

 

हे देखील वाचा