Friday, November 6, 2026
Home › बॉलीवूड › एका वर्षानंतर अचानक सक्रिय झाले सुशांतचे फेसबुक अकाऊंट; चाहते म्हणाले, ‘काश तू जीवंत असता…’

एका वर्षानंतर अचानक सक्रिय झाले सुशांतचे फेसबुक अकाऊंट; चाहते म्हणाले, ‘काश तू जीवंत असता…’

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा जन्म २१ जानेवारी १९८६ रोजी झाला. तो भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता होता. त्याने २०१३ साली ‘काय पो छे’ या चित्रपटातून रूपेरी पडद्यावर पदार्पण केले. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून घोषित करण्यात आले होते. दरम्यान, १४ जून २०२० रोजी सुशांतने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या जाण्याने त्याचे अनेक चाहते प्रचंड दु:खावले गेले. सुशांतचे चाहते आजही त्याला विसरु शकले नाही. जवळपास एक वर्षापेक्षा अधिक काळ लोटून गेला आहे. सुशांतचा मृत्यू झाल्यानंतरही चाहते त्याच्या सोशल मीडियावर अकाउंटला फाॅलो करत आहेत. मात्र नुकतेच सुशांतचे फेसबुक अकाऊंट अचानक सक्रिय झाले, त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला.

सुशांतच्या फेसबुक अकाऊंटचा प्रोफाईल फोटो बदलण्यात आला आहे. हे पाहुन त्याचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. फेसबुक प्रोफाईलमध्ये बदल होताच, चाहते भावुक होऊन त्याला श्रध्दांजली वाहत आहेत. एका चाहत्याने कमेंट्समध्ये लिहीले की, “काश आज तु जिवंत असतास.” तर दुसऱ्याने लिहीले की, “काही क्षणासाठी मला वाटले की, सुशांत तु परत आला आहेस.” तर काही जण ‘मिस यू सुशांत’ असे लिहून ईमोजी शेअर करत आहे.

दरम्यान, १४ जुन २०२० साली वांद्रे स्थित फ्लॅटमध्ये सुशांत सिंग राजपूतचा मृतदेह आढळला होता. सुरुवातीला तपास सुरू असताना पोलिसांनी याला आत्महत्या म्हटले होते. तर सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने दावा केला होता की, सुशांत नैराश्याला बळी पडला होता. त्याचवेळी दुसरीकडे त्याचे कुटुंबे आणि चाहते म्हणतात की, सुशांतची हत्या करण्यात आली आहे. सध्या सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. गेल्या एक वर्षापासून सुशांतचे चाहते त्याला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक प्रकारच्या सोशल मीडियावर मोहिमा राबवत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आलिया भट्टला किस करताना दिसला रणबीर कपूर, ‘त्या’ फोटोमध्ये पाहायला मिळाली दोघांची रोमॅंटिक केमिस्ट्री

-‘सुपर डान्सर ४’च्या मंचावर शिल्पा शेट्टीचे दणक्यात स्वागत; सगळ्यांचे प्रेम पाहून अभिनेत्रीला अश्रू झाले अनावर

-Bigg Boss OTT : शमिता शेट्टी अन् राकेश बापट यांच्यामध्ये वादावादी, अभिनेत्रीने दिला डायपर घालण्याचा सल्ला

हे देखील वाचा