सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका म्हणजे ‘सुंदरा मनामध्ये भरली’ होय. या मालिकेने अक्षरशः रसिक प्रेक्षकांना वेड लावले आहे. ९ चा ठोका वाजला की, घराघरात ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही एकच मालिका चालू असते. या मालिकेतील पात्र, त्यांचा संवाद, वेशभूषा या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना प्रामुख्याने पसंत पडतात. त्यातील लतिका आणि तिच्या सासूचे पात्र तर सर्वांना खूप भावतं. त्यांचे प्रेम आणि माया पाहून घराघरातील सासू-सूनेमधील प्रेम जागे झाले आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रामधील प्रेम आणि जिव्हाळा जेवढा ऑनस्क्रीन आहे, तेवढाच तो ऑफस्क्रीन देखील पाहायला मिळतो.
‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत लवकरच मंगळागौर स्पेशल एपिसोड दाखवला जाणार आहे. या मालिकेतील काही फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये मालिकेतील सगळे कलाकार नटलेले दिसत होते. तसेच आगामी एपिसोडचे काही प्रोमो देखील समोर आले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये या मालिकेतील लतिका, अभिमन्यू, हेमा, सरिता असे सगळे कलाकार दिसत आहेच. सगळ्या महिलांनी नऊवारी साडी नेसलेली आहे. तसेच सगळा साजशृंगार केला आहे. अभिमन्यूने देखील कुर्ता घातलेला आहे. (sundara manamadhe bharali upcoming episodes photo viral on social media)
यामध्ये लतिकाने आकाशी रंगाची नऊवारी, तर अभिमन्यूने गुलाबी रंगाचा कुर्ता घातलेला आहे. इतर काही फोटोंमध्ये महिला मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसत आहेत. त्यांचे हे फोटो पाहून येणारा एपिसोड एकदम भन्नाट असणार आहे, याचा अंदाज लावला जात आहे. या मालिकेत अक्षया नाईक आणि समीर परांजपे मुख्य भूमिकेत आहेत.
या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट येत आहेत. अभी आणि लतिका सध्या एकमेकांपासून लांब राहत आहेत. त्यांचे घरचे देखील त्यांचे लग्न मान्य करत नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे, तर अभी देखील त्याचे प्रेम परत मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. मात्र, येणारा एपिसोड त्यांच्या नात्यामध्ये काही बदल आणेल का, हे पाहण्यासाठी आता प्रेक्षक उत्सुक आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-ताहिराला येतेय पती आयुष्मानची आठवण; म्हणाली, ‘मला सर्वांसमोर प्रेम दाखवण्याचा शौक नाही, पण आम्ही…’
-ऋषी अन् नीतू यांच्या लग्नात सिंदूर लावून पोहोचल्या होत्या रेखा; बिग बींसोबत लग्न…










