Thursday, February 12, 2026
Home मराठी तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना, शिव ठाकरेने शेअर केला त्याच्या बहिणीसोबतचा व्हिडिओ

तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना, शिव ठाकरेने शेअर केला त्याच्या बहिणीसोबतचा व्हिडिओ

मराठी ‘बिग बॉस २’ चा विनर शिव ठाकरे हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. त्याच्या आयुष्यातील अनेक घटनांची माहिती तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. बिग बॉसनंतर तो खूप चर्चेत आला. सोशल मीडियावर देखील त्याच्या चाहत्यांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. बिग बॉसमध्ये असताना फॅमिली विकमध्ये त्याची आई आणि बहीण घरात आले होते. त्यानंतर त्याची बहीण चांगलीच प्रसिद्ध झाली होती. तो अनेकवेळा तिच्यासोबत फोटो शेअर करत असतो. अशातच त्याने रक्षाबंधनानिमित्त त्याच्या बहिणीसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे.

शिवने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते दोघे घरात बसून टीव्ही पाहत असतात, तेव्हा त्यांच्यामध्ये रिमोटवरून भांडणं होतात, तेव्हा शिव त्याच्या बहिणीचा कान ओढून तिची खोड काढतो. मग ते दोघे आतमध्ये जातात. त्याची बहीण कान पकडून त्याला बाहेर आणते आणि त्यांच्यात भांडणं होतात. (Shiv thakare share a video with his sister on social media)

पण ते पुन्हा आत जातात आणि नंतर ते रक्षाबंधनासाठी औक्षणाचे ताट घेऊन येतात आणि त्याची बहीण त्याला ओवाळून त्याला राखी बांधते. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला ‘ओ बेहना मेरी बेहना’ हे गाणे लागले आहे. त्यांचा हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करून त्याने रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शिवने याआधी एम टीव्हीवरील ‘रोडीज’ या शोमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर तो ‘बिग बॉस’मुळे खूप चर्चेत आला होता. या शोमध्ये त्याचे आणि विणा जगतापचे अफेअर खूप गाजले होते. या शोमध्ये त्याने त्याच्या प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावाने घरातील सदस्यांचे मन जिंकून घेतले होते. तसेच त्याने सगळ्या प्रेक्षकांचे देखील मन जिंकले होते. त्यामुळेच तो बिग बॉसच्या‌ दुसऱ्या सिझनचा विजेता ठरला होता. मागील काही दिवसांपूर्वी त्याचे ‘शिलावती’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला होता.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन ‘हे’ कलाकार आपल्या भावा- बहिणींसोबत साजरे करतात रक्षाबंधन

‘माझ्याशी नीट बोलायचं हं…!’ म्हणत प्राजक्ताने अतिशय हटके अंदाजात भावाला दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

‘रियल’ लाइफ भावाबहिणींच्या जोड्या, ज्या गाजवतायेत मोठा पडदा; तर ‘या’ कलाकारांचा आहे यादीत समावेश

हे देखील वाचा