Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

सिनेसृष्टीतील ‘या’ तीन प्रसिद्ध नावांची महापौरपदासाठी शिफारस; तर सोनू सूद आज घेणार मुख्यमंत्री केजरीवालांची भेट

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून अभिनेता सोनू सूद अनेक नागरिकांना मदतीचा हात देत आहे. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या शेकडो नागरिकांना  घरी आणण्यासाठी त्याने मोलाचे सहकार्य केले. आतापर्यंत अनेकांचे जीव सोनूमुळे वाचले आहेत. कोरोनाच्या काळात त्याने ज्याप्रकारे सर्वसामान्यांना मदत केली, तेव्हापासून सोनूचे चाहते त्याला देव म्हणू लागले. अनेक ठिकाणी त्याच्या मूर्तीची स्थापनाही करण्यात आली. यावर सोनूने प्रतिक्रियाही दिली आहे.

सोनू सूद म्हणाला की, “मी देव नाही, मी एक सामान्य माणूस आहे…” तसेच तो पुढे म्हणाला की,“ हे संस्कार मला माझ्या आईकडून मिळाले आहेत.” दरम्यान, एका युजरने ट्वीट केले होते की, “सोनू सूद सर, मला १ कोटी रुपये द्या.” यावर सोनूने एक गंमतीशीर उत्तर दिले आणि लिहिले की, “फक्त १ कोटी? थोडे अजून मागायचे ना.” त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले, “सोनू सर तुम्ही मला तुमच्या अगामी चित्रपटात एखादी भूमिका द्याल का?” यावर प्रतिक्रिया देताना सोनू म्हणाला, “कोणाला तरी मदत करण्यापेक्षा मोठी भूमिका नाही. ती भूमिका तुम्ही पार पाडली, तर तुमच्यापेक्षा मोठा कोणताच नायक नसेल.”

सध्या काँग्रेस बीएमसी निवडणुकीची तयारी करत आहे. हे लक्षात घेता, पक्षाने आपले गमावलेली जमीन परत मिळवण्यासाठी एक विशेष रणनीती तयार केली आहे. पक्षाने हायकमांडला सुचवले आहे की, महापौरपदाचे उमेदवार निवडणुकीपूर्वी जाहीर करावेत.

एवढेच नाही तर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांचा मुलगा अभिनेते रितेश देशमुख, मॉडेल मिलिंद सोमण आणि कोरोनाच्या काळात गरजू लोकांना मदत करणारा आणि अनेक चाहत्यांचा मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता सोनू सूद यांची नावे महापौरपदासाठी शिफारस केला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान अभिनेता सोनू सूद दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची राजधानी दिल्लीत भेट घेणार असल्याचेही वृत्त आहे. मात्र ही बैठक कोणत्या विषयावर आहे, याची कल्पना कोणालाच नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनुपम अन् किरण यांच्या लग्नाला ३६ वर्षे पूर्ण; दोघांनीही दुसऱ्यांदा बांधली होती लगीनगाठ

-‘परी म्हणू की सुंदरा, श्रुतीची अदा करी नेहमीच फिदा,’ अभिनेत्रीच्या फोटोंचा सोशल मीडियावर राडा

-मोनालिसाने ‘साड़ी के फॉल सा’ गाण्यावर लावले जोरदार ठुमके; सोनाक्षीचाही डान्स वाटेल तिच्यासमोर फिका

हे देखील वाचा