Monday, February 24, 2025
Home अन्य Bigg Boss OTT: शोवर भडकली माजी स्पर्धक सोफिया हयात; म्हणाली ‘करण जोहर सलमान खानपेक्षाही वाईट…’

Bigg Boss OTT: शोवर भडकली माजी स्पर्धक सोफिया हयात; म्हणाली ‘करण जोहर सलमान खानपेक्षाही वाईट…’

‘बिग बॉस’ ओटीटी शो प्रेक्षकांचा प्रचंड आवडता शो बनला आहे. बिग बॉस स्पर्धकांमधील वादांमुळे, तर कधी ड्रामामुळे अनेकदा चर्चेत येत आहे. पण आता ‘बिग बॉस’च्या ७ व्या पर्वामध्ये दिसलेली स्पर्धक सोफिया हयातने अलीकडेच शोवर टिका केली आहे. सोफिया म्हणाली,“शोचा होस्ट करण जोहरची होस्टिंग तिला अजिबात आवडत नाही. म्हणूनच तिने करणची तुलना सलमान खानशी केली आहे आणि म्हणाली की, तो सलमान खानपेक्षा वाईट होस्ट आहे.” असे म्हणुन सोफियाने स्पष्टपणे करणवर निशाणा साधला आहे.

‘करण सलमानपेक्षा वाईट होस्ट’
सोफिया म्हणाली की, “करण जोहर सलमान खानपेक्षा वाईट होस्ट आहे. तो केवळ शोमधे हिंसा आणि घराणेशाहीला प्रोत्साहन देतो. हा शो यूकेमध्ये असता तर तो आत्तापर्यंत बंद झाला असता.” सोफिया पुढे असेही म्हणाली की, “करण जाणून-बुजून शोमध्ये आलेल्या लोकांचा अपमान करत आहे. जेणेकरून त्यामुळे टीआरपी वाढण्यास मदत होईल. हा तर बिग बाॅसचा जुना फाॅर्म्युला आहे.”

‘करण शोमध्ये हिंसा आणि अश्लीलतेला प्रोत्साहन देतो’
सोफिया इथेच थांबली नाही, ती पुढे म्हणाली की, “भारत एक अध्यात्मिक भूमी आहे, जिथे धर्म कुणाचंही नुकसान करत नाही. मात्र, करण जोहर आणि ‘बिग बॉस’चा शो धर्माविरुद्ध जाताना दिसत आहे. ते या पवित्रभूमिचा अपमान करत आहेत.” “अशा शोमध्ये मी पुन्हा कधीच जाणार नाही,” असेही ती म्हणाली.

दरम्यान, सोफियाने एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. ती म्हणाली, “सलमान खानसोबत शोच्या अंतिम फेरीत जाणार नाही, कारण तीला त्यांच्यासोबत काम करायचे नाही.” असं म्हणत या शोबद्दल विचार करायला हवा असेही ती म्हणाली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कुंद्राच्या अटकेदरम्यान शिल्पा शेट्टीने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘मी चूक केलीय…’

-ज्याला राम गोपाल वर्मा म्हणाले होते, ‘हा मी नाही’; तोच व्हिडिओ शेअर करत इनाया म्हणतेय, ‘हे आम्हीच…’

केबीसी: उत्तर माहित असूनही स्पर्धक आशीष सुवर्णाने घेतली नाही रिस्क, ‘या’ प्रश्नावर क्विट करत सोडला शो

हे देखील वाचा