Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड ‘किंग’ खानने फराह खानसोबत रिक्रिएट केले ‘मैं हू ना’ गाणे; खुल्लम खुल्ला अभिनेत्याला किस करताना दिसली निर्माती

‘किंग’ खानने फराह खानसोबत रिक्रिएट केले ‘मैं हू ना’ गाणे; खुल्लम खुल्ला अभिनेत्याला किस करताना दिसली निर्माती

सुपरस्टार शाहरुख खान आणि चित्रपट निर्माती-कोरिओग्राफर फराह खान यांची मैत्री जुनी आहे. बऱ्याचदा ते एकत्र मस्ती मजा करताना दिसतात. अनेकदा त्यांचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतात, ज्यांना चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. नुकताच त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात यांनी त्यांच्या ‘मैं हूं ना’ या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकवर परफॉर्म करून, पुन्हा एकदा त्यांच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत. फराहने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात दोघेही या गाण्यावर एन्जॉय करताना दिसत आहेत. इतकेच नव्हे, तर क्लिपच्या शेवटी फराह शाहरुखच्या गालावर किस घेतानाही दिसते.

हा मजेदार व्हिडिओ शेअर करत फराहने लिहिले आहे की, “माझ्या सर्वात आवडत्या वन ऍंड ओन्ली शाहरुखसोबत.” सोबतच तिने ‘मैं हूं ना’, ‘फराह के फंडे.’ हे हॅशटॅगही दिले आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत ८१.८ हजार वेळा पाहिले गेले आहे. (shah rukh khan recreates mai ho na moment with farah khan)

अभिनेता रणवीर सिंगने यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने व्हिडिओवर अनेक हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत आणि लिहिले, “ओह्ह्ह्ह हर्ट मेल्ट.” अभिनेता रितेश देशमुखने लिहिले, “ऑल टाइम फेव्हरेट.” याव्यतिरिक्त क्रिती सेनन, शक्ती मोहन आणि श्रेया घोशालनेही या व्हिडिओवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

फराहने २००४ मध्ये ‘मैं हूं ना’ द्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले होते. यात झायद खान, सुष्मिता सेन, अमृता राव आणि सुनील शेट्टी देखील होते. ‘मैं हूं ना’ नंतर शाहरुख आणि फराहने ‘ओम शांति ओम’ आणि ‘हॅपी न्यू इयर’ सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कुंद्राच्या अटकेदरम्यान शिल्पा शेट्टीने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘मी चूक केलीय…’

-ज्याला राम गोपाल वर्मा म्हणाले होते, ‘हा मी नाही’; तोच व्हिडिओ शेअर करत इनाया म्हणतेय, ‘हे आम्हीच…’

-केबीसी: उत्तर माहित असूनही स्पर्धक आशीष सुवर्णाने घेतली नाही रिस्क, ‘या’ प्रश्नावर क्विट करत सोडला शो

हे देखील वाचा