Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी ‘या’ अभिनेत्रींनी केलंय अतिशय बोल्ड फोटोशूट; पाहून चाहतेही झाले हैराण

डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी ‘या’ अभिनेत्रींनी केलंय अतिशय बोल्ड फोटोशूट; पाहून चाहतेही झाले हैराण

अनेक लोकांना फोटो काढण्याची प्रचंड आवड असते. तर काही लोकांना फोटो क्लिक करायला आवडतात. तसेच बाॅलिवूडमध्ये फोटोशूटला खूप महत्व दिले जाते. कोणत्याही चित्रपटात काम करण्यासाठी ऑडिशन घेतले जाते. मात्र, ऑडिशन देण्यासाठी फोटो मागितले जातात. अनेकदा फोटो बघून निर्माता-दिग्दर्शक कलाकारांची निवड करत असतात. इंडस्ट्रीमध्ये अनेक फोटोशूट करणारे फोटोग्राफर आहेत, परंतु सर्वात मोठे नाव म्हणजे डब्बू रत्नानी होय. डब्बू रत्नानीने इंडस्ट्रीतील सर्व मोठ्या कलाकारांचे फोटोशूट केले आहेत.

डब्बू रत्नानी दरवर्षी आपल्या कॅलेंडरसाठी टॉप अभिनेत्रींचे फोटोशूट करतो. दरवर्षी हे कॅलेंडर हॉटनेसबद्दल खूप चर्चेत राहते. या फोटोशूटमध्ये अनेक मोठ-मोठ्या अभिनेत्रींच्या नावाचा समावेश आहे. डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी बोल्ड फोटोशूट करणाऱ्या अभिनेत्री आहेत तरी कोण? पाहुयात बोल्ड फोटोशूट करणाऱ्या या अभिनेत्रींची यादी.

कियारा आडवाणी

बोल्ड आणि हॉट अभिनेत्रींच्या या यादीतील सर्वात नवीन नाव म्हणजे कियारा आडवाणी होय. २०२० मध्ये तिने डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी बोल्ड फोटोशूट केले होते. या फोटोशूटमध्ये तिने एका पानाचा कपडे म्हणून वापर केला. या फोटोशूटनंतर बी-टाऊनमध्ये तिच्याबद्दल बरीच चर्चा झाली.

सनी लिओनी
सनी लिओनीने डब्बू रत्नानीच्या आगामी कॅलेंडरसाठी फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये ती टॉपलेस दिसत आहे . ज्यात तिने स्वतःचे शरीर मोठ्या टोपीने झाकलेले दिसत आहे. बाॅलिवूडची ‘बेबी डाॅल’ म्हणजे अभिनेत्री सनी लिओनी होय. सनी तिच्या स्टाईलमुळे आणि हाॅटलुकमुळे सतत चर्चेत असते.

दीपिका पदुकोण

स्टाईल आणि फॅशनच्या दृष्टीने अभिनेत्री दीपिकाला फॅशन क्वीन म्हणून ओळखले जाते. आत्ताची सर्वात टॉपची हिरोईन म्हणून दीपिका पदुकोण ओळखली जाते. तसेच भारतीय पारंपारिक ड्रेसपासून ते वेस्टर्न ड्रेसपर्यंत सर्व काही तिच्यावर एकदम खुलून दिसते. दीपिकाने डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी बोल्ड फोटोशूट केले आहे. दीपिका या फोटोमध्ये खुर्चीवर बसलेली दिसत आहे. तसेच ती नग्न अवस्थेत पोझ देताना दिसत आहे.

परिणीती चोप्रा
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने तिच्या खास भूमिकांमुळे चाहत्यांची मोठी पसंती मिळवली आहे. परिणीतीने यावर्षी डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी फोटोशूट‌ केले आहे. कॅलेंडरसाठी काढलेल्या फोटोमध्ये परिणीती पिवळ्या वॅगनमध्ये अतिशय हॉट स्टाईलमध्ये बसलेली दिसली. परिणीती अभिनेत्री प्रियांका चोप्राची बहिण आहे. तिने अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात स्वत: ची एक वेगळीच जागा निर्माण केले आहे.

क्रिती सेनन
‘मिमी’ चित्रपटानंतर चर्चेत राहिलेली अभिनेत्री म्हणजे क्रिती सॅनन होय. २०१८ मध्ये तिने डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी एक हॉट फोटोशूट केले. त्या फोटोशूटमध्ये क्रितीने स्वतःला फक्त टोपीने झाकलेली दिसत आहे. यासोबतच तिने हातात ब्रेसलेटही घातले आहे. क्रिती तिच्या हाॅट लूकमुळे आणि अभिनयामुळे अनेक चाहत्यांच्या मनावर राज्य करते.

 

आलिया भट्ट
कियाराप्रमाणेच आलिया भट्टनेही डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी बोल्ड फोटोशूट केले आहे. २०१७ मध्ये आलियाने काळ्या मांजरीसोबत सुंदर फोटोशूट केले होते, जे त्यावेळी खूप चर्चेत आले होते. ते फोटोशूट सोशल मीडियावरही प्रचंड धुमाकूळ घालत होते. आलिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तसेच ती सतत फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करताना दिसते.

दिशा पटानी
बाॅलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे दिशा पटानी होय. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दिशा तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सतत हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते.

तिने डब्बूसाठी एक बोल्ड फोटोशूटही केले आहे. २०१७ मध्ये केलेल्या फोटोशूटमध्ये ती टॉपलेस दिसत आहे. या फोटोमधील लूकमुळे तिने चाहत्यांच्या मनात आग लावली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘लंबी है जिंदगी, मिलेंगे फिरसे…’, म्हणत सिद्धार्थ शुक्लाने घेतला सर्वांचा निरोप; व्हायरल होतोय व्हिडिओ

मूर्ती लहान पण कीर्ती महान! सोपी नव्हती वाट, वाचा के.के. गोस्वामी यांनी यशाचा शिखर गाठण्यासाठी केलेला संघर्ष

-एकदम झक्कास! अनुजा साठेच्या नवीन फोटोवर श्रेया बुगडेची कमेंट; म्हणाली…

हे देखील वाचा