असे म्हटले जाते की, ‘बदनाम हुये तो क्या हुवा नाम तो हुआ’. ही म्हण मनोरंजनाविश्वातील काही कलाकरांना अगदी तंतोतंत लागू होते. आपली पब्लिसिटी व्हावी, मीडियामध्ये प्रकाशझोतात यावे, प्रसिद्धी मिळावी म्हणून कलाकार काय काय शक्कल लढवतील याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. मात्र य सर्वांमध्ये सर्वात सोपा आणि गुणकारी उपाय म्हणजे फॅशन. अर्थात विचित्र कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी जायचे आणि लाइमलाईट्मधे यायचे. अनेक सेलिब्रिटी हे हत्यार वापरत चर्चेचा विषय बनतात.
नुकतेच असे काहीसे केले आहे बिग बॉस ओटीटीची स्पर्धक असणाऱ्या उर्फी जावेदने. काही दिवसांपूर्वी उर्फी एअरपोर्टवर स्पॉट झाली, यावेळी तिने घातलेले कपडे फारच गाजले. या कपड्यांमध्ये ती तिची ब्रा फ्लॉन्ट करताना दिसली. तिच्या कपड्यांवरून तिला ट्रोल देखील केले गेले. बिग बॉस पेक्षा अधिक प्रसिद्धी तिला तिच्या या विचित्र कपड्याने मिळवून दिली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तिने स्पोर्ट्स ब्रा, जॅकेट आणि जीन्स घातली होती. तिचे जॅकेट असे होते की, ज्यातून तिची ब्रा दिसत होती. यावरून तिच्या फॅशन सेन्सवर देखील प्रश्न उठवले गेले. तिची ही फॅशन चांगल्या चांगल्या लोकांच्या लक्षात आली नाही.
मात्र आता उर्फीने तिच्या या लूकवर तिची बाजू मंडळी आहे. एका मोठा वृत्तपत्राशी बोलताना तिने सांगितले, “मी माझ्या कपड्यांपेक्षा देखील जास्त काही आहे. लोकं माझ्याबद्दल कधीच बोलत नाही. मी काहीही पोस्ट केले सलवार सूट मधील फोटो, बिकिनी मधील फोटो, जीन्समधील फोटो लोकं अश्लील कमेंट्स करतातच. मी लखनऊच्या रूढीवादी परिवारातून येते. असे असूनही माझ्या घरी कपडे हा कधीच मुद्दा नव्हता. मी मला जे आवडते ते मी सर्व घालते. त्याबद्दल लोकं काय बोलतात याचाच मी विचार करत नाही.”
एयरपोर्ट लूकवरून ती पुढे म्हणाली, “मला जर असे कपडे घालून पब्लिसिटी मिळवायची असती तर मी कपडे न घालताच एयरपोर्टवर पोहचली असती. मी जशी आहे तशीच बाहेरही दिसते. यामुळे जर मला पब्लिसिटी मिळत असेल तर चांगलेच आहे ना.” उर्फी पुढे तिच्या कोणत्या माध्यमातील इच्छेबद्दल बोलताना म्हणाली, “मला ओटीटीवर काम करण्याची खूप इच्छा आहे. कारण टीव्हीवर कलाकाराला स्वतःला व्यक्त होताना मर्यादा पडतात. मात्र ओटीटीवर कलाकार त्याचे गुण बिनदिक्कतपणे मांडू शकतो.”
उर्फी बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या पर्वात सहभागी झाली होती. पण ती पहिल्याच आठवड्यात या शोमधून बाहेर पडली.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-एकदम झक्कास! अनुजा साठेच्या नवीन फोटोवर श्रेया बुगडेची कमेंट; म्हणाली…










