Saturday, September 26, 2026
Home › मराठी › ‘आईशप्पथ नादखुळा सौंदर्य!’ समृद्धी केळकरचा फोटो पाहून चाहत्यांना अनावर झालं प्रेम

‘आईशप्पथ नादखुळा सौंदर्य!’ समृद्धी केळकरचा फोटो पाहून चाहत्यांना अनावर झालं प्रेम

स्टार प्रवाह या वाहिनीवरील सगळ्याच मालिका सध्या ट्रेडिंग आहेत. प्रत्येक मालिकेचे कथानक उत्कृष्ट आहे. पण या सगळ्या मालिकांमध्ये एक मालिका चांगलीच लोकप्रिय ठरत आहे, ती मालिका म्हणजे ‘फुलाला सुगंध मातीचा’ होय. या मालिकेची कहाणी, शीर्षक गीत, पात्र, डायलॉग सगळ्यांनी आतापर्यंत प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. डोळ्यात पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न घेऊन मोठी झालेली एक सर्वसामान्य घरातील मुलगी, पण संसाराचा‌ गाडा ओढताना ती तिच्या स्वप्नाचा त्याग करते. या सगळ्यात तिचा जोडीदार म्हणजे तिचा पती कसा नव्याने तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उभारी देतो. ही कहाणी या मालिकेतून दाखवली आहे.

या मालिकेत प्रमुख भूमिकेत असणारी अभिनेत्री समृद्धी केळकरने तिच्या भूमिकेला उत्तम न्याय दिला आहे. तिचे पात्र चांगलेच गाजत आहे. तिच्या सालस स्वभावाने, अभ्यासू वृत्तीने आणि मनमिळावू स्वभावाने सगळ्यांचे प्रेम मिळवले आहे. समृद्धी सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते. तिचा एक फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे. (fulala sugandh maticha fame samruddhi kelkar’s photo viral on social media)

समृद्धीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने आकाशी रंगाचा एक शॉर्ट ड्रेस घातलेला दिसत आहे. तिने पायात काळ्या रंगाची चप्पल घातलेली आहे. ती समुद्रकिनारी उभी राहिलेली दिसत आहे. तिच्या याच लूकमधील आणखी काही फोटो देखील तिने शेअर केले आहेत.

हा फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे कि, “कुछ ऐसे पलटकर देखेंगे हम, के आप चाह कर भी नजर अंदाज नही कर पाओगे.” तिने शेअर केलेला हा फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहे. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “आईशपथ नादखुळा सौंदर्य” तसेच आणखी एकाने कमेंट केली आहे की, “मी फक्त तुमच्यासाठी ही मालिका बघतो.” तिचा हा फोटो चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. फोटोला आतापर्यंत ५८ हजारापेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत.

‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत समृद्धीसोबत अभिनेता हर्षद अटकरी मुख्य भूमिकेत आहे. हर्षदने याआधी ‘दुर्वा’, ‘अंजली’, ‘सारे तुझ्याचसाठी’ या मालिकेत काम केले आहे, तर समृध्दीने ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेत काम केले आहे. ही मालिका हिंदीमधील ‘दिया और बाती हम’ या मालिकेचा रिमेक आहे. हिंदीमध्ये देखील ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कैसे भुलू तुझे! सिद्धार्थच्या निधनाने अजून ही धक्क्यात आहे आसीम; सतत पाहतोय दोघांचे व्हिडिओ

-देशाबाहेरही व्यक्त केला जातोय सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाचा शोक; जॉन सीनाने वाहिली अभिनेत्याला श्रद्धांजली

-सायरा बानूंची आयसीयूमधून झाली मुक्तता; डिप्रेशन अन् ऍंजिओग्राफीबद्दल खुलासा करत डॉक्टर म्हणाले…

हे देखील वाचा