Monday, March 2, 2026
Home कॅलेंडर पहिली ती किटकिट बंद करा! अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कोरोना कॉलरट्यून हटवण्यासाठी न्यायालयात याचिका

पहिली ती किटकिट बंद करा! अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कोरोना कॉलरट्यून हटवण्यासाठी न्यायालयात याचिका

कोरोनाने गेल्या वर्षी भारतात प्रवेश केला होता आणि आजही परिस्थिती जैसे थेच आहे. कोरोनावरील लसी भारतात अजून परिक्षणाखाली आहेत. त्यामुळे व्हायरसचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी सरकार जनजागृती करीत आहे.

सोशल मीडिया, टीव्ही आणि फोनच्या माध्यमातून कोरोनापासून लोकांना सतर्क राहण्याबाबत सांगण्यात येत आहे. कुणालाही फोन लावला तर तो लागण्यापूर्वी बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकू येतो. ज्यात ते लोकांना कोरोनापासून वाचण्याचा सल्ला देतात. मात्र, आता बिग बींचा आवाज फोनवरून काढून टाकण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात थेट याचिका दाखल करण्यात आली आहे.

Amiitabh New Pic
Amiitabh New Pic

कोरोनाविरोधात सावधगिरी बाळगणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यून काढून टाकण्याची विनंती करणारी याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. खरं तर, याचिकेत असं म्हटलं गेलं आहे की स्वत: बिग बींना कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यांचं कुटूंब देखील कोरोना संक्रमित राहिलं आहे.

गुरुवारी मुख्य न्यायाधीश डी.एन. पटेल आणि न्यायमूर्ती ज्योती सिंह यांच्या खंडपीठासमोर ही याचिका आणण्यात आली. खंडपीठाने १८ जानेवारीपर्यंत याचिका पुढे ढकलण्यात आली कारण याचिकाकर्त्याच्या वकिलांनी शारीरिक सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहण्यास असमर्थता दर्शविली.

काही प्रसिद्ध कोरोना योद्धा आपला आवाज विनामूल्य देण्यास इच्छुक आहेत, परंतु त्यांना न घेता सरकारने स्वत: कुटूंबासह या आजारापासून संक्रमित झालेल्या अमिताभ बच्चन यांचा आवाज सरकारने त्या कॉलर ट्यूनसाठी वापरला आहे.

अधिवक्ता ए.के. दुबे आणि पवन कुमार यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटलं आहे की, भारत सरकार अमिताभ बच्चन यांना कॉलर ट्यूनवरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत आवाज देण्यासाठी पैसे देत आहे. त्याच वेळी काही कोरोना योद्धा आहेत जे देशाची सेवा करीत आहेत आणि गरीब आणि गरजू लोकांना मदत करीत आहेत. ते कोणतेही पैसे न घेता त्यांच्या सेवा देण्यास तयार आहेत आणि देशाची सेवा करण्यास तयार आहेत.

विशेष म्हणजे, याचिकेत असा आरोप केला गेला आहे की, अमिताभ बच्चन यांचा इतिहास फारसा स्पष्ट नाही आणि त्याचबरोबर ते समाजसेवक म्हणून देशाची सेवा करीत नाहीत.

याचिकाकर्त्याने नोव्हेंबर २०२० मध्ये अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते पण त्याला उत्तर मिळालं नाही त्यानंतर त्यांनी मग अखेरचा पर्याय म्हणून दिल्ली उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं. आता नेमकं काय होणार? बिग बींच्या आवाजातील कॉलर ट्यून तशीच राहणार की ती हटवण्यात येणार हे आपल्याला १८ तारखेलाच कळेल.

हे देखील वाचा