Tuesday, June 2, 2026
Home बॉलीवूड दिवसाढवळ्या अभिनेत्री अलंकृता सहायच्या घरावर दोरोडा; चाकू दाखवून दरोडेखोरांनी…

दिवसाढवळ्या अभिनेत्री अलंकृता सहायच्या घरावर दोरोडा; चाकू दाखवून दरोडेखोरांनी…

अभिनेत्री आणि माॅडेल अलंकृता सहाय हिच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. दिवसाढवळ्या या अभिनेत्रींच्या घरी जाऊन दरोडेखोरांनी लुटमार केली आहे. मंगळवारी (७ सप्टेंबर) दुपारी साडेबाराच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्ती अलंकृताच्या घरात शिरले. त्यांनी तिला चाकू दाखवून साडे सहा लाख रुपये लुटले. दरोडेखोरांनी आधीच अलंकृताला ओलीस ठेवले आणि नंतर दोन तास घरात जाऊन सर्व सामान साफ केल्यानंतर बाल्कनीतून उडी मारून पळून गेले.

अलंकृता सहाय बसली होती बाथरुममध्ये लपून
भीतीपोटी अलंकृता घराच्या बाथरूममध्ये लपून बसली होती. या दरम्यान दरोडेखोरांनी तिच्याकडेचे एटीएम आणि एटीएमचा पिन नंबर ही मागून घेतला. यानंतर या दरोडेखोरांनी एटीएममधून 50 हजार रुपये काढले. ही घटना मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास चंदीगडच्या सेक्टर- २७ मधील इमारतीत घडली. गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. या घटनेनंतर अलंकृता खूप घाबरली आहे.

मिस इंडिया झाली होती अलंकृत सहाय
अभिनेत्री अलंकृता हिने २०१४मध्ये मिस इंडियाचा किताब पटकावला आहे. अलंकृता सेक्टर- २७ मधील लेफ्टनंट कर्नलच्या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर राहते, ती भाडेकरू आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, मास्क घातलेले तीन तरुण मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास तिच्या खोलीत शिरले. तिघांच्याही हातात चाकू होते. तरुणांनी तिला चाकू दाखवून धमकावण्यास सुरुवात केली. ही संपूर्ण घटना घडल्यानंतर दरोडेखोर फरार झाले.

दरोडेखोरांनी साडेसहा लाख रुपये केले लंपास
दरोडेखोरांनी खोलीची झडती घेतली आणि सुमारे सहा लाखांची रोख रक्कम लंपास केली. याशिवाय एटीएममधून ५० हजारांपेक्षा अधिक रुपये काढण्यात आले. अलंकृता मूळची दिल्लीची आहे. ती एका महिन्यापूर्वीच चंदीगडला शिफ्ट झाली आहे. एका पंजाबी म्युझिक व्हिडिओमध्ये अभिनयाच्या संदर्भात अलंकृत चंदीगडला आली होती. पोलिसांच्या तपासात दरोडेखोरांचे फुटेज इमारतीच्या पायऱ्यांवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सापडले आहे. पोलीस आता फुटेजच्या आधारे त्यांचा शोध घेत आहेत.

अलंकृता ही एक भारतीय सुपरमॉडेल- अभिनेत्री आणि सौंदर्य स्पर्धा विजेती आहे, तिला २०१४ची मिस इंडिया किताब देण्यात आला होता. फिलिपिन्समध्ये झालेल्या मिस इंडिया स्पर्धेमध्ये ७ विजेतेपद पटकावणारी ती पहिली भारतीय महिला आहे. आजकाल अभिनेत्री पंजाबी चित्रपट आणि म्युझिक व्हिडिओमध्ये खूप काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एका रात्रीत स्टार बनलेली रानू मंडल प्रसिद्धी मिळाल्यानंतर क्षणातच बदलली; लवकरच येणार बायोपिक

-सुपरस्टार नागार्जुन यांची सून समंथाने फ्लॉन्ट केले ऍब्ज; पाहून तुम्हीही घालाल तोंडात बोटे

-‘हद्द झाली यार!’ सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर व्लॉग बनवणाऱ्या संभावना सेठवर भडकले नेटकरी

हे देखील वाचा