Sunday, January 26, 2025
Home बॉलीवूड एका रात्रीत स्टार बनलेली रानू मंडल प्रसिद्धी मिळाल्यानंतर क्षणातच बदलली; लवकरच येणार बायोपिक

एका रात्रीत स्टार बनलेली रानू मंडल प्रसिद्धी मिळाल्यानंतर क्षणातच बदलली; लवकरच येणार बायोपिक

लता मंगेशकर यांचे गाणे गाऊन एका रात्रीत स्टार बनलेली रानू मंडलला अमाप प्रसिद्धी मिळाली. मात्र, त्यानंतर जीवन पहिल्यासारखे राहिले नाही. रानूने जे काही परिधान केले आणि गायले ते तिच्या आवाजाच्या आधारावर इंटरनेट सेन्सेशन बनले. ते बरेच चर्चेचा विषय ठरत होते. पश्चिम बंगालमधील राणाघाट स्टेशनवरून प्रसिद्ध झालेल्या रानूने गायलेले ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणे प्रदर्शित होताच सोशल मीडियावर खळबळ उडाली. तिची सर्वत्र चर्चा झाली आणि तिची लोकप्रियता गगनाला भिडली.

पण, एका रात्रीत चमकणारा रानू मंडलच्या नशिबाचा हा तारा लवकरच नाहीसा झाला. नोव्हेंबर २०१९ मध्ये रानू मंडलने हिमेश रेशमियासोबत तीन गाणी रेकॉर्ड केली, पण गेल्या काही दिवसांत तिच्याबद्दल कोणीच काही ऐकले नाही. माध्यमांतील माहितीनुसार, कोरोना महामारीमुळे तिची प्रकृती अधिकच बिघडली आहे. आजकाल रानूला मुंबईत कोणतेही काम मिळत नाही, यामुळे ती खूप अस्वस्थ आहे.

रानू एकामागून एका वादात अडकली
अचानक प्रसिद्धी मिळाल्यानंतर एकापाठोपाठ एक वादांनी घेरलेली ‘राणाघाट की लता’ आता नवीन संधी शोधत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोकप्रिय झाल्यानंतर रानूने तिचे जुने घर सोडून नवीन घरात स्थलांतर केले, पण नंतर माध्यमांमध्ये सांगण्यात आले की, ती हे नवीन घर सोडून आपल्या जुन्या घरात परतली आहे. रानूकडे बॉलिवूडमध्ये फारसे काम नव्हते. अशा परिस्थितीत आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ती आपल्या जुन्या घरात परतली.

रानूच्या वागण्यात झाला बदल
त्याचवेळी अशा परिस्थितीवर सोशल मीडियावर रानूच्या वागण्यावर बरीच चर्चा झाली. स्टार झाल्यानंतर रानू मंडलची वृत्ती देखील खूप बदलली होती. ती अनेक वेळा चाहत्यांशी आणि माध्यमांशी गैरवर्तन करताना दिसली. एवढेच नाही, तर रानूच्या हिमेशसोबतच्या भांडणाच्या बातम्याही समोर आल्या. यामुळे तिला खूप ट्रोलही करण्यात आले होते. सोशल मीडियावरही लोक तिला गर्विष्ठ म्हणू लागले होते.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मिळाली प्रसिद्धी
रानू मंडलचा एका व्यक्तीने पश्चिम बंगालमधील राणा घाटाच्या रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा’ हे गाणे गातानाचा व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ त्या व्यक्तीने सोशल मीडियावर अपलोड केला होता. व्हिडिओ व्हायरल होताच रानू मंडल एका रात्रीत स्टार बनली. त्याचबरोबर लवकरच रानू मंडलच्या वास्तविक जीवनावर एक बायोग्राफी बनवणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटात ती स्वतः तिच्याच आवाजात एक गाणे गाणार आहे.

रानू मंडलची बायोपिक येणार लवकरच
दिग्दर्शक ऋषिकेश मंडलच्या म्हणण्यानुसार, आधी बंगालीमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण करण्याची योजना होती, पण नंतर चित्रपट हिंदीत शूट करण्याचा निर्णय घेतला. दिग्दर्शकाने सांगितले की, या चित्रपटातील भूमिकेसाठी आधी माझ्या मनात सुदीप्ता चक्रवर्तीचे नाव होते. सुदिप्ता उत्सुक होती, पण काही तारखेच्या समस्येमुळे ती या प्रोजेक्टमध्ये सामील होऊ शकली नाही. यासाठी माझ्या मनात अनेक कलाकारांची नावे होती, पण प्रत्येकाने रानू मंडलचे पात्र साकारणे अपमानास्पद समजले. शेवटी इशिका डे ही भूमिका साकारण्यास तयार झाली.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कंगणाच्या कारकिर्दीतील ‘थलायवी’ हा सर्वोत्कृष्ट सिनेमा’, म्हणत समीक्षक तरण आदर्श यांनी केले कौतुक

-सिद्धार्थच्या निधनाने खूपच खचलीय शहनाझ; ना नीट जेवतेय, ना नीट झोपतेय; एकटीला सोडणे झालंय कठीण

-कुरकुरीत पकोडे पाहून शिल्पाच्या तोंडाला सुटले पाणी, एकटीनेच केले फस्त; थ्रोबॅक व्हिडिओ भन्नाट व्हायरल

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा