मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत चित्रपटांव्यतिरिक्त, सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळेही चर्चेत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती सतत तिचे फोटो, व्हिडिओ पोस्ट करून नेटकऱ्यांचे मनोरंजन करते. आपले ग्लॅमरस फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधण्याची एकही संधी ती चुकवत नाही. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, प्राणी-पक्ष्यांवर पूजाचे खूप प्रेम आहे. अशातच तिच्या काही फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा चालू आहे.
पूजाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती एका सश्यासोबत दिसत आहे. या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा आणि लाल रंगाची फुलं असणारा एक शॉर्ट ड्रेस घातला आहे. सोबतच तिच्या हातात अतिशय सुंदर आणि क्युट ससा आपल्याला दिसत आहे. पूजा तिच्या या फोटोमध्ये खूपच आनंदी दिसत आहे.
हे फोटो शेअर करून तिने एक खास कॅप्शन देखील दिले आहे. तिने लिहिले आहे की, “सशांसाठी माझ्या हृदयात नेहमीच एक खास जागा असते. लहान असताना माझ्याजवळ देखील एक ससा होता.” तिच्या या फोटोवर तिचे अनेक चाहते त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. पूजा फिरायला जॅम आवडते काही दिवसांपूर्वीच ती चिखलदऱ्याच्या दौऱ्यावर गेली होती. त्याचे अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.
पूजा सावंतच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून २०१० मध्ये चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. या चित्रपटात तिने भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील, सोनाली कुलकर्णी या कलाकारांसोबत काम केले होते. तिनं आतापर्यंत मराठीमध्ये अनेक चित्रपट केले आहेत त्यामुळे आता तिचा चाहतावर्गसुद्धा मोठा आहे. त्यात ‘दगडी चाळ’, ‘लपाछपी’, ‘झकास’, ‘नीळकंठ मास्टर’, ‘चिटर’, ‘वृंदावन’, ‘पोस्टर बॉईज’ या चित्रपटात काम केले आहे. पूजा सावंत तिच्या डान्समुळे देखील खूप लोकप्रिय आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पहिल्यांदा दिसल्या सायरा बानो; हातात होता दिलीप कुमारांचा फोटो
-कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर ‘अशी’ झाली होती रुबीनाची हालत; म्हणाली, ‘मी पुन्हा ५० किलो वजन…’


