गणेशोत्सवाची प्रत्येकजण वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. कुटुंबाला एकत्र आणणारा हा सण सगळ्यांना हवाहवासा वाटतो. सगळ्यांच्या घरी आज बाप्पाचे आगमन झाले आहे. अनेक मराठी कलाकार त्यांच्या घरातील गणरायाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अशातच ‘कॉमेडी क्वीन’ श्रेया बुगडे हिच्या घरी देखील गणरायाचे आगमन झाले आहे. याची झलक तिने सोशल मीडियावर दाखवली आहे.
श्रेया बुगडेने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या घरातील बाप्पासोबत काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, श्रेया तिच्या पतीसोबत दिसत आहे. तिने पिवळ्या रंगाची साडी नेसलेली आहे. हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र, हातावर मेहेंदी असा सगळा तिने साजशृंगार केला आहे. श्रेयाने या वर्षी केळीच्या, आंब्याच्या पानांचा आणि झेंडूच्या फुलांचा गणपतीचा देखावा केला आहे. (Comedy queen shreya bugade share her home ganpati photo on social media)
त्यांच्या गणपतीचा हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “वर्षभर या एका सणाची मी खूप आतुरतेने वाट पाहते. माझा लाडका बाप्पा आज विराजमान झाला. आजपासून सुरू झालेल्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा! बुद्धीची देवता असलेला गणपतीराया, आपणा सर्वांना सुख, समृद्धी आरोग्य व यशप्राप्तीसाठी, आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया!” तिच्या या फोटोवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांना तिने केलेले डेकोरेशन आवडले आहे.
श्रेयाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘वाटेवरती काचा गं’ या नाटकाद्वारे अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. तिने ‘तू तिथे मी’ मधून टीव्हीवर पदार्पण केले. त्यानंतर ती ‘फू बाई फू’, ‘माझे मन तुझे झाले’ अशा शोमध्ये दिसली. मात्र, तिला खरी ओळख ‘चला हवा येऊ द्या’ या शोने मिळवून दिली. क्वचितच लोकांना माहिती असेल की, श्रेयाने गुजराती मालिकेमध्येही काम केले आहे. ती ‘छुत्ता छेडा’ या गुजराती मालिकेत झळकली होती.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-श्वास रोखून धरा! रजनीकांत यांच्या ‘अन्नाथे’ चित्रपटाचा फर्स्ट लूक आला समोर; ‘या’ दिवशी होणार रिलीझ
-क्रिकेटमधील ‘दादा’ गाजवणार सिनेमाचं मैदान; झालीय सौरव गांगुलीच्या बायोपिकची घोषणा
-‘घर की मुर्गी दाल बराबर!’ माधुरी दीक्षितने स्वतः लाच का दिली असेल ही उपमा?