Sunday, February 1, 2026
Home बॉलीवूड बापरे! ‘भूल भुलैया २’ शूटिंग दरम्यान कार्तिक आर्यनसोबत घडली ‘ही’ घटना, सर्वजण गेले घाबरून

बापरे! ‘भूल भुलैया २’ शूटिंग दरम्यान कार्तिक आर्यनसोबत घडली ‘ही’ घटना, सर्वजण गेले घाबरून

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या चित्रपटांमध्ये खूप व्यस्त आहे. त्याच्याकडे सध्या अनेक प्रकल्प आहेत. त्यापैकी एका प्रकल्पावर तो काम करत आहे. पण या सततच्या कामामुळे कार्तिक आर्यनचा आवाज हरवला आहे. होय, कार्तिक आर्यनच्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आवाज बंद झाला आहे.

गेला कार्तिकचा आवाज
आजकाल कार्तिक आर्यन त्याच्या आगामी ‘भूल भुलैया २’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. २०१९ मध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले होते. परंतु कोरोना व्हायरसमुळे ते बराच काळ थांबवले होते. आता चित्रपटाचे शूटिंग पूर्ण सुरू होणार आहे. सध्या या चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन शूट केला जात आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, कार्तिक आर्यन आणि तब्बू या सीनमध्ये समोरासमोर दिसणार आहेत. त्याच दरम्यान ‘भूल भूलैया २’ च्या क्लायमॅक्स सीनच्या शूटिंग दरम्यान, कार्तिक आर्यनचा आवाज त्याच्या घशातून बाहेर पडणे बंद झाले. असे म्हटले जात आहे की, चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन ड्रामा आणि ऍक्शनने परिपूर्ण आहे. अशा परिस्थितीत, या विशिष्ट सीनमध्ये कार्तिकला खूप जोरजोरात ओरडावे लागत आहे.

विश्रांतीची आहे गरज
अभिनेता कार्तिक आर्यन या चित्रपटात एका तांत्रिकच्या भूमिकेत दिसणार आहे. अशा परिस्थितीत असे म्हटले जात आहे की, जेव्हा कार्तिकला या सीनमध्ये किंचाळावे लागले. तेव्हा त्याचा आवाज अचानक बंद झाला. यानंतर चित्रपटाची संपूर्ण टीम हे पाहून खूप घाबरली. असे म्हटले जात आहे की, कार्तिकची ही अवस्था पाहून निर्मात्यांनी तातडीने डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी कार्तिक आर्यनला विश्रांतीची गरज असल्याचे सांगितले आहे. सतत ओरडण्यामुळे त्याचा वोकल कॉर्ड खराब होऊ शकतो.

कार्तिक आर्यनचे चित्रपट
कार्तिक आर्यन आणि तब्बू यांच्या व्यतिरिक्त ‘भूल भूलैया २’ मध्ये कियारा आडवाणी, राजपाल यादव आणि संजय मिश्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या भागात अक्षय कुमार, विद्या बालन, सायनी आहुजा मुख्य भूमिकेत दिसले होते. अशा परिस्थितीत प्रत्येकाला कार्तिककडून मोठ्या आशा आहेत. या चित्रपटाव्यतिरिक्त कार्तिक आर्यन एकता कपूरच्या ‘फ्रेडी’ मध्ये अलाया फर्निचरवालासोबत दिसणार आहे. त्याचबरोबर कार्तिकचा ‘धमाका’ हा चित्रपटही प्रदर्शनासाठी तयार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रेमाला कोणतीही सीमा नसते! ‘या’ अभिनेत्रींनी स्वतःपेक्षा लहान वयाच्या मुलासोबत बांधली लग्नगाठ

-मराठी कलाकारांच्या घरात झाली श्रींची स्थापना, फोटो शेअर करून दाखवली बाप्पाची झलक

-मराठी कलाकारांच्या घरी झाले गणरायाचे आगमन, सुंदर फोटोंवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

हे देखील वाचा