Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड आयुष्मानने केला पुतणीचा फोटो शेअर; वडील अपारशक्तीच्या कुशीत झोपलेली दिसली आरझोई

आयुष्मानने केला पुतणीचा फोटो शेअर; वडील अपारशक्तीच्या कुशीत झोपलेली दिसली आरझोई

अभिनेता अपारशक्ती खुराना आणि आकृती आहूजा हे दोन महिन्यांपूर्वीच आई- बाबा झाले आहेत. आकृतीने ४ जून रोजी आपल्या मुलीला जन्म दिला होता. हे दोघेही आपल्या आयुष्यात आलेल्या या छोट्या परीमुळे खूप खुश आहेत. त्यांनी आपल्या मुलीचे नाव आरझोई  ठेवले आहे. दोघेही त्यांच्या मुलीवर खूप प्रेम करतात. दोघांनी अजूनपर्यंत तिचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला नव्हता. परंतु आता आरझोईचे  काका आयुष्मान खुरानाने त्याच्या पुतणीने फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

आयुष्मान खुराना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व गोष्टींची माहिती तो सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना देत असतो. दरम्यान त्याने आपल्या पुतणीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने आपल्या इंस्टाग्रामच्या  स्ट्रोरीवर हा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये आरझोई तिच्या वडिलांच्या खांद्यावर शांत झोपलेली आहे. तिला पाहून चाहते खूप खुश आहेत. अनेक चाहत्यांनी कमेंट करून  तिचे कौतुक करत तिला दीर्घ आणि सुदृढ आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल देखील होत आहे.

Photo Courtesy Instagramayushmannk

यापूर्वी अपारशक्ती खुरानाची पत्नी आकृती आहूजाने देखील आपल्या मुलीचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्या फोटोमध्ये देखील आरझोई तिच्या बाबांबरोबर असल्याचे दिसून आले होते. आकृतीने हा फोटो शेअर करत आपल्या पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. परंतु यामध्ये आरझोईचा चेहरा नीट दिसत नव्हता. त्यामुळे चाहत्यांना तिला नीट पाहता आले नव्हते. परंतु आयुष्मानने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा संपूर्ण चेहरा दिसत आहे. त्यामुळे चाहते या चिमुरडीला पाहून भलतेच खुश झाले आहेत.

अपारशक्ती आणि आकृती हे दोघेही सप्टेंबर २०१४ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. त्यावेळी देखील या दोघांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते दोघे एकमेकांना डेट करत होते. त्यामुळे दोघांनी आपल्या नात्याला पती पत्नीचे नाव देण्याचे ठरवले. त्यावेळी या दोघांच्या प्रेम कहाणीची खूप चर्चा रंगली होती. सोशल मीडियावर ते दोघेही एकमेकांबरोबरचे फोटो चाहत्यांसाठी पोस्ट करत होते. सध्या दोघेही आपल्या मुलीच्या संगोपनामध्ये व्यस्त आहेत.

आयुष्मानप्रमाणेच अपारशक्ती हा देखील एक उत्तम अभिनेता असून चित्रपट ‘दंगल’मध्ये तो पहिल्यांदा झळकला होता. तसेच साल २०१७ मध्ये ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’मध्ये देखील त्याने दमदार अभिनय साकारला होता. तसेच ‘दंगल’ आणि ‘स्त्री’ या चित्रपटासाठी त्याला पुरस्कार देखील मिळाले आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ट्रोलर्सवर गरजली अर्शी खान, गणरायाच्या पूजेचे ‘हे’ फोटो केले होते पोस्ट

-‘बिग बॉस’च्या ‘या’ स्पर्धकांनी दिलाय जगाला निरोप; कोणी केली आत्महत्या, तर कोणाला आला हार्ट अटॅक

-कंगना नव्हे, तर ऐश्वर्याला ‘थलायवी’मध्ये पाहू इच्छित होत्या जयललिता; सिमी गरेवालने केला खुलासा

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा