Saturday, September 21, 2024
Home मराठी ‘खानविलकर ऑन फायर!’ अमृता खानविलकरचे फोटो पाहून चाहत्यांसह कलाकारांनाही फुटलाय घाम

‘खानविलकर ऑन फायर!’ अमृता खानविलकरचे फोटो पाहून चाहत्यांसह कलाकारांनाही फुटलाय घाम

मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्रींचा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा अभिनेत्री अमृता खानविलकर हिचा नावाचा समावेश असतोच असतो. अमृता ही विविध गुणसंपन्न अभिनेत्री आहे. तिने चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका निभावून तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर देखील अमृता बऱ्यापैकी सक्रिय असते. तिचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिचा साडीमधील एक फोटो समोर आला आहे.

अमृताने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने पांढऱ्या रंगाची साडी नेसलेली आहे. यावर तिने लाल रंगाचा स्लिव्हलेस ब्लाऊज घातला आहे. तिने केसांचा अंबाडा घातला आहे आणि केसात गजरा माळला आहे. तसेच कपाळी लाल रंगाची टिकली लावली आहे. कानात सुंदर झुमके घातले आहेत. या फोटोमध्ये ती एकंदरीतच खूप सुंदर दिसत आहे. ( Marathi actress amruta Khanvilkar share her photos on social media)

तिने शेअर केलेला हा फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. तिच्या या फोटोवर आदिनाथ कोठारे, ईशा भन्साळी, मंजिरी ओक आणि सोनाली खरे यांनी कमेंट केल्या आहेत. सोनाली खरे हिने “खानविलकर ऑन फायर” अशी कमेंट केली आहे. तसेच बाकी अनेक चाहते देखील या फोटोवर कमेंट करत आहेत.

अमृताच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. तिने ‘नटरंग’, ‘चोरीचा मामला’, ‘वेलकम जिंदगी’, ‘बाजी’, ‘वेल डन बेबी’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘जीवलगा’ या लोकप्रिय मालिकेत देखील काम केले आहे. या मालिकेत तिच्यासोबत स्वप्नील जोशी, सिद्धार्थ चांदेकर आणि मधुरा देशपांडे हे कलाकार होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मामा-भाच्याचे नातं इतकं कसं बिघडलं? जाणून घ्या कृष्णा अभिषेक आणि गोविंदामधील वादाच कारण

-पहिलीपासून लपून दुसऱ्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी ‘दबंग खान’ने चक्क बदलले होते स्वतःचे दात; मजेदार आहे तो किस्सा

-काय सांगताय! बॉलिवूडच्या ‘किंग खान’ला ‘या’ गोष्टीची वाटतेय भीती, करण जोहरने केला खुलासा

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा