अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूने संपूर्ण अभिनयसृष्टीला मोठा धक्का बसला होता. अशात त्याची मैत्रिण म्हणजेच शहनाझ गिल ही पूर्णपणे खचून गेली होती. सोशल मीडियावर आणि बिग बॉसच्या घरामध्ये आपण सर्वांनी त्या दोघांचे एकमेकांवरील प्रेम पाहिले आहे. तिला आधीपासूनच सिद्धार्थ खूप आवडायचा. तिला त्याच्यासोबत लग्न देखील करायचे होते. परंतु २ सप्टेंबर रोजी सिद्धार्थने या जगाचा निरोप घेतल्याने शहनाझ मनातून तुटून गेली. आपल्याला ज्याच्यासोबत पूर्ण आयुष्य घालवायचे आहे, ती व्यक्ती आज या जगात नाही, याची शहनाजने कधी चुकून कल्पनाही केली नव्हती. परंतु असे काही घडेल हे कुणालाच माहित नव्हते.
अशात सिद्धार्थच्या निधनानंतर सोशल मीडियावर, तसेच अनेक वृत्तांमध्ये शहनाझच्या तब्येतीवर भाष्य करण्यात आले होते. त्यावेळी तिची प्रकृती ठीक नव्हती. तसेच तिने अन्नपाणी देखील सोडले होते. त्यामुळे सध्या तिची काय परिस्थिती आहे? ती सिद्धार्थाच्या धक्यातून सावरली आहे की नाही? अशी चिंता सर्वांना सतावत आहे. सोशल मीडियावर अनेक चाहते तिच्या विषयी तिच्या कुटुंबीयांकडे विचारपूस करत आहेत. (Actor Abhinav Shukla told the situation of shehnaaz after Siddharth Shukla death)
अशातच अभिनेता अभिनव शुक्ला आणि रुबीना दिलैक यांनी शहनाझच्या तब्येतीवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनव आणि रुबीना सिद्धार्थच्या आईला भेटायला गेले होते. त्यानंतर स्पॉट बॉयला दिलेल्या मुलाखतीत अभिनव म्हणाला की, “शहनाझ आता हळूहळू बरी होत आहे. मी तिच्यासाठी आणि सिद्धार्थच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करतो. देव त्यांना या प्रसंगातून सावरण्याची ताकत देवो.” पुढे सिद्धार्थाच्या आई विषयी सांगत तो म्हणाला की, “मी आणि रुबीना त्याच्या आईला भेटलो होतो. आता त्या देखील हळूहळू बऱ्या होत आहेत. मी देवाकडे प्रार्थना करतो की, त्यांच्या दुःखाला शांती मिळो.”
अभिनव शुक्ला आणि सिद्धार्थ शुक्ला हे दोघेही खूप चांगले मित्र होते. त्यांनी साल २००४मध्ये ग्लॅण्डरिंग्स मॅनहंट आणि मेगामॉडल कॉन्टेस्टमध्ये एकत्रच करिअरला सुरुवात केली होती. अभिनव पुढे म्हणाला की, “आम्ही आमच्या करिअरची सुरुवात एकत्र केली होती. तसेच ‘बाबुल का आंगन’मध्ये एकत्र काम केले. सिद्धार्थकडे कायमच एक विचित्र बुद्धी होती. तो एक चतुर आणि चलाख होता. आम्हाला दोघांनाही बाईकचे वेड होते. त्याचा निधनाने आमच्या सर्वांचीच मने दुखावली आहेत. माझी प्रार्थना त्याच्या परिवाराबरोबर कायम आहे.”
सिडनाझच्या जोडीसाठी अनेक चाहत्यांनी प्रार्थना केली होती. अनेक चाहत्यांना वाटत होते की, त्या दोघांचे लग्न व्हावे. परंतु आता शहनाझ एकटी पडल्यामुळे तिच्या चाहत्यांना तिची काळजी सतावत आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-विद्युत जामवालने ताजमहालला साक्षी ठेवत गर्लफ्रेंडसोबत कमांडो’ स्टाईलमध्ये केला साखरपुडा
-लॉकडाऊनमध्ये दरदिवशी कंगनावर नोंदवले जायचे २०० हून अधिक एफआयआर, अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा










