कलाकारांना त्यांच्या अभिनयामध्ये अनेकवेळा प्राण्यांच्या ही भूमिका पार पाडाव्या लागतात. अशात छोट्या पडद्यावर आपल्या वेगवेगळया रूपांनी विशेष म्हणजे नागिन बनून सर्वांच्या मनातील विष काढून टाकणारी अभिनेत्री निया शर्मा. नियाने तिच्या गोड अभिनयाने सर्वांच्याच मनातील विश काढून टाकले आहे. अभिनेत्रीने आपल्या कारकिर्दीमध्ये कधी बहिण बनून प्रेक्षकांची मने जिंकली, तर कधी नागिन बनून सर्वांना घबरवले आणि वेगळा संदेशही दिला. निया शुक्रवारी ( १७ सप्टेंबर) तिचा वाढदिवस साजरा करते. वाढदवसानिमित्त जाणून घेऊयात तिची आतापर्यंतची कारकीर्द.
टीव्ही मालिकांमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री निया शर्माचे खरे नाव नेहा शर्मा असे आहे. तिचा जन्म दिल्लीमध्ये १७ सप्टेंबर १९९० रोजी झाला. दिल्लीमध्येच तिचे प्राथमिक आणि पदवीचे शिक्षण पूर्ण झाले. तिने जगन्नाथ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस, नवी दिल्ली येथून मास कॉम्युनिकेशनची पदवी घेतली. अभिनेत्री तिच्या घरामध्ये सर्वात लहान असल्याने ती आधीपासूनच सर्वांची लाडकी होती. तिने आता पर्यंत अनेक मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका निभावल्या आहेत. आपल्या दमदार अभिनयासह ती दमदार मानधन देखील घेते. निया तिच्या मालिकेतील प्रत्येक एपिसोडसाठी २ लाख रुपये मानधन घेते. (Happy Birthday nia Sharma real name and work with Akshay Kumar for jamai Raja and no interesting things related to actress life )
आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला तिने साल २०१० मध्ये आलेली मालिका ‘काली, एक अग्नी परीक्षा’मधून सुरुवात केली. त्यानंतर साल २०११ मध्ये तिने ‘बेहने’ या मालिकामध्ये काम केले. नियाच्या अभिनयाला कलाटणी देणारी ‘एक हजारो में मेरी बेहना है’ ही मालिका ठरली. या मालिकेमधून ती घराघरात पोहचली. तिच्या आयुष्यातील ३ वर्षे चाललेली ही पहिली एक यशस्वी मालिका होती.
तिने साल २०१४ मध्ये बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या ‘जमाई राजा’मध्ये देखील काम केले. अक्षय या शोचा निर्माता होता. साल २०१४ ते २०१६ पर्यंत तिने या शोमध्ये काम केले. त्यानंतर तिने या शोमधून रजा घेतली. त्यानंतर साल २०१७ मध्ये नियाने डिजिटलच्या मायाजालमध्ये पाऊल टाकले. तिने विक्रम भट्ट यांच्या ‘ट्विस्टेड’ या इरोटिक थ्रिलर सीरिजमध्ये काम केले. तिने या ‘ट्विस्टेड’च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्वामध्ये देखील दमदार भूमिका निभावली.
नियाने साल २०१७ मध्ये काळजात धडकी भरवणारा शो अर्थातच ‘फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी’च्या ८ व्या पर्वात भाग घेतला. ती या शोमधून दोन वेळा बाद झाली. तिसऱ्या वेळी जेव्हा तिने या शोमध्ये पुन्हा पाऊल टाकले, तेव्हा तिने ते शेवटपर्यंत टिकवून ठेवले. तसेच ती ‘फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी’च्या ८ व्या पर्वाची विजेती देखील झाली. त्यानंतर ‘मेरी दुर्गा’ या मालिकेमध्ये तिने २०१८ पर्यंत काम केले.
साल २०१९ तिच्या साठी मोठी परीक्षा घेणारे ठरले. कारण तिला नागिणची भूमिका पार पाडायची होती. तिने ‘नागिन ४: भाग्य का जहरीला खेल’ या मालिकेमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये शूटिंग वेळी करावा लागणार मेकअप खूप हेवी असायचा. तसेच यातील अभिनय देखील नेहमी पेक्षा थोडा वेगळा होता. तिला यामध्ये रुप बदलणाऱ्या नागिणीची भूमिका पार पाडायची होती. या मालिकेमध्ये तिने तिच्या अभिनयाला पूर्णपणे न्याय दिला आणि तिच्या चाहत्या वर्गात आणखी भर पडली. या मालिकेने संपूर्ण रसिक प्रेक्षकांना वेड लावले होते. साल २०२० मध्ये आलेल्या कोरोनाच्या महामारीपर्यंत ती या मालिकेमध्ये झळकत होती.
अभिनेत्री पुन्हा साल २०२०मध्ये रवी दुबेसोबत ‘जमाई राजा २.०’ मध्ये झळकली. दोघांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. नियाने मालिकांसह अनेक वेब सीरिजमध्ये देखील काम केले. तसेच तिच्या म्युजिक व्हिडिओंनी देखील चाहत्यांना भुरळ घातलेली आहे. नुकतंच तिचं ‘दो घुंट’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याने तरुणाई चांगलीच वेडी झाली आहे. या गाण्यामधील नियाचा डान्स आणि तिचा दिलखेचक लूक पाहून सोशल मीडियावर तिचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जात आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘कू’ ऍपवरही कंगना रणौत गाजवतेय वर्चस्व; काही दिवसांतच मिळवले तब्बल ‘इतके’ फॉलोव्हर्स
-‘हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट’, म्हणत मनोज पाटील आत्महत्या प्रकरणावर साहिल खानने सोडले मौन
-शूटिंग सोडून तुर्कीमध्ये ‘हे’ काम करताना दिसली बॉलिवूडची ‘बार्बी गर्ल’, व्हिडिओ शेअर करत म्हणतेय…