Sunday, March 22, 2026
Home बॉलीवूड ‘द ऍक्टिव्हिस्‍ट’ शोमुळे प्रियांकावर ओढवली नामुष्की, नाराज प्रेक्षकांची सोशल मीडियावर मागितली माफी

‘द ऍक्टिव्हिस्‍ट’ शोमुळे प्रियांकावर ओढवली नामुष्की, नाराज प्रेक्षकांची सोशल मीडियावर मागितली माफी

कलाकार नेहमीच त्यांच्या चित्रपटांमुळे आणि त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतात. अनेकदा कलाकार त्यांच्या पोस्टमुळे वादात देखील अडकले आहेत. तसे पाहिले तर कलाकार आणि वाद यांचे खूप जवळचे नाते आहे. लहान मोठे सर्वच कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादात अडकतच असतात. यात बॉलिवूडच्या अभिनेत्रींचा देखील समावेश आहे. हिंदी सिनेसृष्टीच्या देसी गर्लने अर्थात प्रियांका चोप्राने केवळ बॉलिवूडमध्ये नाही तर हॉलिवूडमध्ये सुद्धा तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रियंकाने हॉलिवूडच्या प्रसिद्ध गायक आणि अभिनेता असलेल्या निक जॉनसासोबत लग्न केल्यानंतर प्रियांका सध्या अमेरिकेत राहते.

नेहमी या ना त्या कारणामुळे चर्चेत असणारी प्रियांका यावेळेस मात्र एका वेगळ्याच कारणामुळे ती चर्चेत आली आहे. मागील काही दिवसांपासून प्रियांका तिच्या ‘द ऍक्टिव्हिस्‍ट’ या शोमुळे चर्चेत आली आहे. नुकताच तिच्या या शोचा प्रिमियर सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यानंतर प्रियांकाला मोठ्या प्रमाणावर ट्रोलही केले आहे. या शोच्या फॉरमॅटमुळे ट्रोल झालेल्या प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत सर्वांची माफी मागितली आहे.

प्रियंकाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “मागील काही दिवसांपासून तुमच्या आवाजाची ताकद पाहून मी अवाक झाले आहे. जेव्हा लोकं एकत्र येत एखाद्या मुद्द्यावर बोलतात तेव्हा त्यांना नक्कीच यश मिळते. मात्र ‘द ऍक्टिव्हिस्‍ट’ कार्यक्रमात या संकल्पनेला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले. या कार्यक्रमाचा भाग होऊन मी खूप लोकनाची नाराजी ओढवून घेतली. त्यासाठी मी सर्वांची माफी मागते. आमचा उद्देश फक्त एखाद्या मुद्द्यासाठी तळागाळात काम करणाऱ्या व्यक्तीला प्रसिद्धी मिळवून देणे एवढाच होता. मात्र, कार्यक्रमाच्या मूळ हेतूसोबत अजिबात तडजोड करण्यात आलेली नाही. तरीही तुमच्या भावना दुखवल्याबद्दल मी माफी मागते. जागतिक स्तरावर अनेक सामाजिक कार्यकर्ते समाजाला पुढे आणण्यासाठी, समाजात बदल घडवण्यासाठी काम करतात. पण तात्यांचे काम आणि ते कधीही जास्त पुढे येत नाही. या शोच्या माध्यमातून अशा लोकांना एक ओळख मिलीन त्यांच्या कामाचा गौरव व्हावा हाच आमचा उद्देश होता.”

‘द ऍक्टिव्हिस्‍ट’ हा एक वास्तवदर्शी कार्यक्रम असून, त्यात सहा सामाजिक कार्यकर्त्यांना तीन टीममध्ये विभागले जाते. प्रत्येक टीमला एक एक मुद्दा दिले जाऊन, त्या मुद्द्यावर आधारित विविध टास्क दिले जातात. या टास्कमध्ये स्पर्धकांनी समाजातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा. जो यात यशस्वी होतो तो जिंकतो आणि जिंकणाऱ्या टीमला बक्षीस म्हणून रोख रक्कम दिली जाते.  या कार्यक्रमातून सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा केल्यामुळे टीका होत आहे. कार्यक्रमाचा मूळ उद्देश बाजूला ठेऊन फक्त कार्यक्रमाचा टीआरपी वाढवण्यासाठी ही स्पर्धा घेतली जात असल्याचे सर्वांचे म्हणणे आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कू’ ऍपवरही कंगना रणौत गाजवतेय वर्चस्व; काही दिवसांतच मिळवले तब्बल ‘इतके’ फॉलोव्हर्स

-‘हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट’, म्हणत मनोज पाटील आत्महत्या प्रकरणावर साहिल खानने सोडले मौन

-शूटिंग सोडून तुर्कीमध्ये ‘हे’ काम करताना दिसली बॉलिवूडची ‘बार्बी गर्ल’, व्हिडिओ शेअर करत म्हणतेय…

हे देखील वाचा