Tuesday, February 3, 2026
Home वेबसिरीज वेबसिरीज गाजवणाऱ्या ‘या’ कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने ओटीटीच्या जगात निर्माण केली वेगळी ओळख

वेबसिरीज गाजवणाऱ्या ‘या’ कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने ओटीटीच्या जगात निर्माण केली वेगळी ओळख

काळ बदलला तसे मनोरंजनाचे स्वरूप देखील बदलले पूर्वी नवीन सिनेमे बघण्यासाठी चित्रपटगृहांशिवाय दुसरा पर्याय नसायचा. मात्र आता चित्रपटगृहांसोबतच ओटीटी प्लॅटफॉर्मचा उत्तम आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध झाला आहे. या ओटीटीच्या माध्यमातून आपण घरच्याघरी चित्रपटांचा आस्वाद घेऊ शकतो, वेगवेगळ्या वेबसिरीज बघू शकतो. या पर्यायाने आपल्याला कोरोना काळात घरबसल्या मनोरंजनाची सोय करून दिली आहे. असे नाही की ओटीटी प्लॅटफॉर्म आताच सुरु झाले मात्र मागच्या वर्षांपासून या माध्यमाला अनन्यसाधारण महत्व मिळाले आहे. या प्लॅटफॉर्मने अनेक लोकांना काम मिळवून दिले. जे कलाकार चित्रपटांमध्ये मालिकांमध्ये फ्लॉप ठरले त्यांच्यासाठी ओटीटी तारणहार बनून आले. या ओटीटीवर काही कलाकार सतत वेगवेगळ्या सिरीजमधून आपल्याला दिसतात. त्यांना वेगवेगळ्या सिरीजमधून बघणे सर्वांसाठीच एक पर्वणी आहे. या लेखातून अशाच काही कलाकारांची नावे जाणून घेऊया.

जितेंद्र :
जितेंद्र उर्फ जितू भैया आपल्या दादर अभिनयाने जितेंद्रने ओटीटीच्या जगात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जितेंद्र खऱ्या अर्थाने ओटिटीचा सुपरस्टार झाला आहे. ‘कोटा फॅक्टरी’पासून ते ‘पंचायत’पर्यंत त्याने त्याची लहान-मोठी प्रत्येक भूमिका प्रभावीपणे निभावली. याच्या या अभिनयामुळे त्याला आयुष्मान खुराणासोबत ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चिनेमात काम करण्याची संधी मिळाली होती. ही भूमिका देखील त्याने उत्तम पद्धतीने निभावली.

जतिन सरना :
‘सेक्रेड गेम्स’ या सिरीजमध्ये जतीनने ‘बंटी’नावाच्या गॅंगस्टरची भूमिका साकारली होती. या सिरीजच्या दोन्ही भागात त्याने त्याच्या कॉमिक टाइमिंग आणि संवादफेकीच्या जोरावर प्रेक्षकांकडून वाहवा मिळवली. या कौतुकामुळे त्याला अधिक चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी एक हुरूपही मिळाला आहे.

नीना गुप्ता :
नीना यांना कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. सिनेमांपासून सेरिजपर्यंत तयांनी त्यांच्या जिवंत अभिनयाने सर्वांनाच त्यांची दखल घ्यायला भाग पाडले. ‘पंचायत’, ‘मसाबा मसाबा’ आदी अनेक वेबसेरीजमधून त्यांच्या दमदार अभिनयाचे दर्शन सर्वांनाच घडले.

सनी हिंदुजा :
सनी यांनी त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर प्रत्येक भूमिकेत जीव आणला. ‘द अस्पीरेंट्स’ या शो मध्ये त्यांनी साकारलेला संदीप भैया खूपच भाव खाऊन गेला. याशिवाय ‘द फॅमिली मॅन’ मधील टायची भूमिका देखील विशेष लक्षवेधी ठरली.

एहसास चन्ना :
‘गर्ल्स हॉस्टल’पासून ‘हॉस्टल डेज’पर्यंत प्रत्येक सिरीजमध्ये तिने तिच्यात असलेल्या सशक्त अभिनेत्रीला सर्वांसमोर आणले. प्रत्येक भूमिका अगदी लीलया करणारी एहसास आजच्या पिढीतील सर्वांचीच लाडकी आहे.

यासोबतच इतरही असे अनेक कलाकार आहेत ज्यांना ओटीटीने त्यांची कला दाखवण्याची संधी दिली आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कू’ ऍपवरही कंगना रणौत गाजवतेय वर्चस्व; काही दिवसांतच मिळवले तब्बल ‘इतके’ फॉलोव्हर्स

-‘हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट’, म्हणत मनोज पाटील आत्महत्या प्रकरणावर साहिल खानने सोडले मौन

-शूटिंग सोडून तुर्कीमध्ये ‘हे’ काम करताना दिसली बॉलिवूडची ‘बार्बी गर्ल’, व्हिडिओ शेअर करत म्हणतेय…

 

 

हे देखील वाचा