Wednesday, June 25, 2025
Home बॉलीवूड ‘टायगर ३’साठी शूट केले जातायेत जबरदस्त ऍक्शन सीन्स; तुर्कीनंतर आता ‘या’ देशात होणार चित्रपटाची शूटिंग

‘टायगर ३’साठी शूट केले जातायेत जबरदस्त ऍक्शन सीन्स; तुर्कीनंतर आता ‘या’ देशात होणार चित्रपटाची शूटिंग

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो नेहमीच त्याचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. तसेच तो त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल देखील त्याच्या चाहत्यांना माहिती देत असतो. सध्या सलमान खान आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ त्यांच्या आगामी ‘टायगर ३’ या चित्रपटाचे शूटिंग ऑस्ट्रियामध्ये करत आहेत. माध्यमांतील वृत्तानुसार, याठिकाणी चित्रपटाचे काही जबरदस्त ऍक्शन सीन्स शूट केले जातील. सलमान आणि कॅटरिना ऑस्ट्रियामधील विविध नवीन ठिकाणी ऍक्शन सीन्स शूट करतील, ज्यात व्हिएन्नाचाही समावेश आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, ‘टायगर ३’मध्ये ऑस्ट्रियाची ती लोकेशन्स कॅमेऱ्यात कैद केली जातील, जी आजपर्यंत कधीच स्क्रीनवर दिसली नाहीत.

चित्रपटाचे दिग्दर्शक मनीष शर्मा यांचे ‘टायगर ३’साठी एक ग्रँड व्हिजन आहे आणि म्हणूनच त्यांनी ऑस्ट्रियामध्ये हटके लोकेशन्स निवडल्या आहेत, जेणेकरून ते तेथे जाऊन ऍक्शन सीन्स शूट करू शकतील. आधी सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांनी तुर्कीमध्ये चित्रपटाचे काही भाग शूट केले होते. त्यांनी तेथे काही ऍक्शन सीन्स आणि चित्रपटाचे टायटल सॉन्ग गीत शूट केले. काही दिवसांपूर्वी सलमान खानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात तो शूटिंगनंतर त्याच्या ‘जीने के है चार दिन’ या लोकप्रिय गाण्यावर डान्स करताना दिसला होता.

यापूर्वीही असे अनेक फोटो समोर आले होते, ज्यात सलमानने सोनेरी दाढी लावलेली होती. दुसरीकडे, तुर्कीनंतर ऑस्ट्रियाला पोहोचल्यानंतर कॅटरिना सतत तिचे वर्कआउट करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहे. ती ऍक्शन सीन्सच्या तयारीत व्यस्त आहे आणि जिममध्ये प्रचंड घाम गाळत आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, सलमान आणि कॅटरिना व्यतिरिक्त इमरान हाश्मी देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक मनीष शर्मा आहेत.

मनीष शर्मा दिग्दर्शित ‘टायगर’ फ्रँचायझीचा तिसरा भाग  कोव्हिड -१९ च्या विषाणूमुळे स्थगित करण्यात आला होता. कबीर दिग्द खानर्शित पहिला चित्रपट ‘एक था टायगर’ २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. दुसरा ‘टायगर जिंदा है’ २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट अली अब्बास जफर यांनी दिग्दर्शित केला होता.

 

 

हे देखील वाचा