मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या प्रेम कहाणीवर २०१९ पासून चर्चा सुरू आहे. या दोघांना अनेकवेळा एकमेकांबरोबर हॉटेलमध्ये पाहिले गेले आहे. त्यांच्या चाहत्यांनी अनेकवेळा या दोघांच्या नात्याबद्दल त्यांना प्रश्न विचारले. तसेच त्यांच्या लग्नाविषयी देखील अनेकवेळा विचारण्यात आले. परंतु या दोघांनीही नेहमी यावर आपली कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. परंतु आता मलायकाने यावर स्वतःची प्रतिक्रिया दिलेली आहे.
‘सुपर मॉडेल ऑफ द इअर’ या शोमध्ये अभिनेत्रीने हजेरी लावली. यावेळी तिला सूत्रसंचालक मिलिंद सोमणने अनेक प्रश्न विचारले. ज्यामध्ये तिच्या खासगी आयुष्यातील देखील काही प्रश्न होते. मिलिंदने तिला अर्जुनला केलेले मॅसेज तसेच अन्य असे प्रश्न विचारले. ज्यामध्ये ती सतत अर्जुनचा उल्लेख करत होती. या शोमधून तिने चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. मिलिंदने शोमध्ये तिला विचारले की, तुला कसा मुलगा आयुष्याचा जोडीदार म्हणून आवडेल. यावर ती उत्तर देताना खूप अस्वस्थ झाली होती. नेमकं कसं आणि काय सांगावं हे तिला समजत नव्हतं.
Well, now you know what kinda men Malaika likes ????????
Watch #Livon #MTVSupermodelOfTheYear Season 2 Co-Powered by @OlayIndia Retinol, @VanesaBodyDeo, #MagicMomentsMusicStudio @M2magicmoments & Fashion Partner FNGR tomorrow, 7 PM only on MTV India. pic.twitter.com/HSDKUzvaHl
— MTV India (@MTVIndia) September 18, 2021
उत्तर देत ती म्हणाली की, “मला रफ मुलं आवडतात. साधे, भोळे आणि चिकणे मुलं काही कामाचे नसतात. ते खूप भयानक पद्धतीने फ्लर्ट करतात. एक ना एक दिवस त्यांचं खरं रूप समोर येतंच. मला असा मुलगा हवा जो मला खूप छान किस करू शकेल.” सध्या ती अर्जुनच्या प्रेमात आहे आणि तिच्या मते अर्जुन खूप छान किस करतो.
मिलिंदने यानंतर तिला विचारले की, “तू अर्जुनला लास्ट मॅसेज काय केला आहे?” यावर तिने हसत आणि लाजत उत्तर दिले की, “आय लव यु टू.” तसेच नंतर तिला तुला सर्वात जास्त कोण ओळखतं? असे विचारण्यात आले. यावर तिने अर्जुनचेच नाव घेतले. या सर्वांमुळे एवढ्या दिवसांपासून या दोघांच्या सुरू असलेल्या गुपचूप प्रेमावर शिक्कामोर्तब झाला आहे.
पुढे तिला आवडत्या पुरुष सेलिब्रेटीविषयी विचारले तेव्हा तिने जेम्स बॉन्ड सीरिजमध्ये बॉन्डची भूमिका साकारणाऱ्या डॅनियल क्रेगचे नाव घेतले. त्यांनतर महिला सेलिब्रेटीविषयी विचारले, तेव्हा तिने बेला हदीदचे नाव घेतले.
साल २०१९ पासून मलायका आणि अर्जुन एकमेकांच्या प्रेमात आहेत. या आधी अभिनेत्रीचे सलमान खानचा भाऊ अरबाज खानबरोबर लग्न झाले होते. त्याच्याबरोबर घटस्फोट घेतल्यांनंतर आता ती अर्जुनबरोबर सुखी आयुष्य जगत आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-हिना खानचं ‘मैं भी बर्बाद’ गाणं रिलीझ; अभिनेत्रीने अंगद बेदीसोबत दिले बोल्ड सीन
-‘बोल्ड सीनमुळे दिला होता खालच्या पातळीची महिला म्हणून टॅग’, मल्लिका शेरावतचा खुलासा
-असा क्रूर खलनायक, ज्याच्या नावात जरी ‘प्रेम’ असले, तरी चित्रपटांमध्ये ‘ते’ कधीही दिसले नाही










