Sunday, June 8, 2025
Home वेबसिरीज ‘लिटिल थिंग्स’च्या शेवटच्या पर्वाचा ट्रेलर झाला प्रदर्शित, क्षणातच मिळाले लाखो व्ह्यूज

‘लिटिल थिंग्स’च्या शेवटच्या पर्वाचा ट्रेलर झाला प्रदर्शित, क्षणातच मिळाले लाखो व्ह्यूज

एखाद्या जोडप्यामध्ये असलेले प्रेम आणि त्या प्रेमात होणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी. आयुष्यात एकत्र घालवलेले क्षण खूप सारे नखरे आणि त्यापेक्षाही जास्त प्रेम अशी जोडी म्हणजे काव्या आणि ध्रुवची जोडी. या दोघांनी ‘लिटिल थिंग्स’ या वेब सिरीजमधून प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. आता या वेब सिरीजचे चौथे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘लिटिल थिंग्स’ या वेब सिरीजचे चौथे पर्व हे शेवटचे असणार आहे. यामध्येच या वेब सिरीजचा अंत होणार आहे. अशात नेटफलिक्सवर या वेब सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरचा व्हिडिओ प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांचा त्याला खूप प्रतिसाद मिळत आहे. (netflix series little things last season trailer released)

अशात अभिनेत्री मिथिला पालकरने याविषयी तिच्या मनातील काही गोष्टी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितल्या आहेत. ती म्हणाली की, “‘लिटिल थिंग्स’ हा एक असा शो आहे जो माझ्या हृदयाजवळ आहे. काव्या हे एक असे पात्र आहे जे कायमच माझ्याबरोबर असेल. या शोचे दिग्दर्शक, ध्रुव आणि शानदार क्रू यांच्यासह मी खूप छान प्रवास केला. अंतिम पर्वामुळे मला पुन्हा एकदा काव्याला साकारता आले. मला आशा आहे की प्रेक्षक ध्रुव आणि काव्याच्या जोडीला पुन्हा एकदा पसंत करतील आणि स्वतःच्या जोडीदाराबरोबर हे सर्व क्षण साजरे करतील.”

अभिनेता ध्रुव सेहगलने देखील यावर स्वतःच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. तो म्हणाला की, “मी या शोबरोबरच मोठा झालो, आणि खरोखरच आता पर्यंत तुम्ही ध्रुवला जे काही प्रेम दिलं आहे, त्याने मी खूप खुश आहे. खर सांगायचं, तर मला थोडं वाईट वाटत आहे. कारण हा शो आता संपणार आहे. पण मी आनंदी देखील आहे कारण ध्रुव आणि काव्याला तुम्ही सर्वांनी एवढं प्रेम दिलं.”

मिथिला पालकर आणि ध्रुव सहगल अभिनित ‘लिटिल थिंग्स’च्या चौथ्या पर्वात ध्रुव आणि काव्या त्यांच्या आयुष्यातील पुढच्या टप्प्यावर विचार करताना दिसणार आहेत. या दोघांनी बरेच दिवस एकत्र घालवले. आता आपण एकत्र राहून लग्न, मुलं, घर या जबाबदाऱ्या सांभाळू शकतो की नाही, यावर ते संवाद साधताना दिसणार आहेत. तसेच यामध्ये ते आपल्या भविष्यातील व्याधी, अडचणी, सुख, दुःख याविषयी देखील बोलणार आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

बॉलिवूडचे ‘हे’ मोठे सिनेमे ठरले नुसताच फुसका बार, कमाईतून बजेट वसूल करणे देखील झाले मुश्किल

बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्रींनी लग्नानंतर त्यांच्या यशस्वी चित्रपटांच्या करिअरला ठोकला रामराम

प्रायव्हेट जेटमध्ये मांडी घालून बसलेल्या प्रियांका चोप्राचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले, ‘खरी देसी गर्ल’

हे देखील वाचा