Thursday, March 19, 2026
Home कॅलेंडर …जणू भासे अप्सराच, श्रुती मराठेचे फोटो पाहून तुम्ही स्वर्गातील अप्सरा देखील विसराल

…जणू भासे अप्सराच, श्रुती मराठेचे फोटो पाहून तुम्ही स्वर्गातील अप्सरा देखील विसराल

श्रुती मराठे मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची आणि लोकप्रिय अभिनेत्री. श्रुती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती तिचे मतं, व्हिडिओ, काही अपडेट नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सला देत असते. सोबतच ती तिच्या विविधी फोटोशूटमुळे सोशल मीडियावर सर्वात जास्त चर्चेत असते. कधी साडीत तर कधी वेस्टर्न स्टाईल श्रुतीच्या प्रत्येक फोटोशूटला तिचे चाहते पसंती देतात.

मराठीसोबतच श्रुती दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम करते. श्रुतीच्या अभिनयसोबतच तिच्या सौंदर्यावरही लोकं घायाळ असतात. नुकतेच श्रुतीने पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केले असून त्यातले काही फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. श्रुती तिच्या या भारतीय पोषाखामध्ये अधिक सुंदर दिसत आहे. तिचा सोबर ड्रेस आणि त्यावर सिल्वर रंगाची ज्वेलरी असा साधा लुक लोकांना आकर्षित करत आहे. तिच्या फोटोंवर तिच्या फॅन्ससोबतच अनेक कलाकार देखील तिला कमेंट्स देत आहेत.

श्रुतीने मराठीसोबतच साऊथ चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तिने ‘इंदिरा विजहा’ या तमिळ चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. श्रुती तमिळ इंडस्ट्रीमध्ये श्रुती प्रकाश नावाने ओळखली जाते. श्रुतीने तमिळमध्ये ‘इंदिरा विजहा’, ‘प्रेमसूत्र’, ‘नान अवन इल्लै २’ हे सुपरहिट चित्रपट केले आहेत. शिवाय ती मराठीमध्ये ‘सनई चौघडे’, ‘मुंबई पुणे मुंबई २’, ‘तप्तपदी’, ‘रमा माधव’, ‘असा मी असा मी’, ‘शुभ लग्न सावधान’ आदी चित्रपटांमध्ये काम केले आहेत. शिवाय तिने श्रुतीने आतापर्यंत काही जाहीराती आणि वेब सिरीजमध्येही अभिनय केला आहे. श्रुतीने झी मराठीच्या ‘राधा ही बावरी’मध्ये काम केले होते. या मालिकेमुळे श्रुतीला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

श्रुतीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर तिने अभिनेता गौरव घाटणेकर सोबत लग्न केले आहे. या दोघांची पहिली भेट तुझी माझी लव्हस्टोरी या सिनेमाच्या सेटवर झाली. तीन वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.

हे देखील वाचा