‘दिल दोस्ती दुनियादारी’ या लोकप्रिय मालिकेतून यातील कलाकार घराघरात पोहचले. यातलाच एक कलाकार म्हणजे, अभिनेता अमेय वाघ होय. यातील त्याचे ‘कैवल्य’ हे पात्र प्रचंड लोकप्रिय ठरलं. कैवल्य बनून त्याने चाहत्यांच्या हृदयात एक विशेष स्थान मिळवलं आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.
आता अमेय सोशल मीडियावर देखील तितकाच सक्रिय राहतो. या ठिकाणी त्याचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून, तो चाहत्यांचे भरभरून मनोरंजन करतो. त्याच्या पोस्टखालील कॅप्शन विशेषतः नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनते. नुकताच त्याने शेअर केलेला व्हिडिओ आता चांगलाच चर्चेत आला आहे. (Amey Wagh shared interesting marathi tongue twisters take a look)
त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो ‘टंग ट्विस्टर’बद्दल बोलताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता क, ख आणि ग पासून सुरू होणारे टंग ट्विस्टर बोलत आहे. विशेष म्हणजे, तो ज्या मजेदार पद्धतीने बोलत आहे, हा अंदाज नेटकऱ्यांना चांगलाच पसंत पडला आहे. शिवाय तो इतरांना मराठी टंग ट्विस्टरचं चॅलेंज देतानाही दिसत आहे.
व्हिडिओच्या कॅप्शनबद्दल बोलायचं झालं, तर त्याने कॅप्शनही बरंच मजेदार लिहिलं आहे. कॅप्शनमध्ये अमेय म्हणतोय की, “जीभेला हाड असतंच… ते थोडं वळवावं लागतं! हे Tongue Twisters संजना पाटणकर ह्यांनी तयार केले आहेत! ज्यांना Acting मध्ये career करायचंय त्यांनी तर ह्याचा सराव नक्की करा!” आता या मजेशीर व्हिडिओवर चाहत्यांच्याही मजेदार प्रतिक्रिया उमटत आहेत.
अमेयच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर त्याने विविध माध्यमातून चाहत्यांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. नाटक, मालिका, चित्रपट शिवाय वेब सिरीजमध्ये देखील तो झळकला आहे. ‘मुरांबा’, ‘फास्टर फेणे’, ‘धुराळा’ या चित्रपटातील अमेयच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. अभिनेता अखेरच्या वेळेस ‘झोंबिवली’मध्ये दिसला होता.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-भयावह! बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांना आलाय खऱ्या भूतांचा अनुभव, ऐकून तुमचाही उडेल थरकाप
-Bigg Boss 15: यावेळी जंगल थीमवर बनलंय ‘बिग बॉस’चं घर, फोटो पाहून तुम्हीही कराल कौतुक
-मैत्रिणींसह भटकंतीला निघाली जान्हवी कपूर, निसर्गाच्या सानिध्यात घालवतेय वेळ