Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘मी घालते तेव्हा चिप आणि स्टारकिड्स घालतात तेव्हा… हा भेदभाव आहे’, उर्फीचे ट्रोलर्सला सणसणीत उत्तर

सोशल मीडिया सध्या तुफान वाढणारे, लोकप्रियता देणारे सर्वात मोठे माध्यम आहे. कलाकारांसाठी तर सोशल मीडिया हे एक वरदान ठरत आहे. पोस्टच्या माध्यमातून त्यांना या प्लॅटफॉर्मवरून अमाप लोकप्रियता मिळते. फॅन्सससोबत थेट जोडले जात असल्याने या माध्यमाला खूपच महत्व प्राप्त झाले आहे. पण ते म्हणतात ना नाण्याला दोन बाजू असतात, अगदी तसेच जिथे तुमची खूप प्रशंसा, स्तुती होते तिथे तुम्हाला वाईट म्हणणारे देखील अनेक लोकं आहेत. ज्या सोशल मीडिया पोस्टमुळे कलाकार लाइमलाईट्मधे येतात त्याच सोशल मीडिया पोस्टमुळे त्यांना ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. कलाकार सोशल मीडियावर ट्रोल होणे ही खूपच सामान्य गोष्ट आहे. कपडे, पोस्ट, मतं यांपासून अगदी शुल्लक गोष्टींसाठी देखील कलाकारांना ट्रोल केले जाते.

सध्या ट्रॉलर्सच्या निशाण्यावर सतत येणारी एक अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद. बिग बॉस ओटीटीमधून प्रकाशझोतात आलेली उर्फी नेहमी तिच्या विचित्र फॅशन सेन्समुळे ट्रोल होते. तिची फॅशन कोणाला समजतच नसल्याने नेटकरी नेहमी तिच्या फॅशन सेन्सवर तिच्या कपड्यांवर सडकून टीका करतात. नेहमी टीकेला सामोरी जाणाऱ्या उर्फीने यावेळेस ट्रोलर्सला जोरदार उत्तर दिले आहे.

उर्फीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तिने तिच्यासोबत भेदभाव होत असल्याचे सांगितले आहे. या व्हिडिओमध्ये तिने म्हटले की, “जेव्हा मी बिकिनी घातली तेव्हा मी चिप दिसत होती, स्किन दाखवत होती. मात्र जेव्हा स्टारकिड्सने बिकिनी घातली तेव्हा ते बोल्ड दिसतात. उर्फीने एक पर्पल रंगाचा लेहेंगा घातलेला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये तिचा लूकपांहून पुन्हा अनेकांनी तिला ट्रोल केला तेव्हा तिने तिचा हा व्हिडिओ पोस्ट केला.

एका मुलाखतीमध्ये तिला ती पब्लिसिटी मिळवण्यासाठी असे कपडे घालते असे लोकांचे म्हणणे आहे सांगितल्यावर ती म्हणाली होती की, “जर मला पब्लिसिटी मिळवायची असती तर मी एयरपोर्टवर बना कपड्यांचीच गेले असते.” उर्फी नेहमीच तिच्या कपड्यांवरून जोरदार ट्रोल होताना दिसते.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भयावह! बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांना आलाय खऱ्या भूतांचा अनुभव, ऐकून तुमचाही उडेल थरकाप

-Bigg Boss 15: यावेळी जंगल थीमवर बनलंय ‘बिग बॉस’चं घर, फोटो पाहून तुम्हीही कराल कौतुक

-मैत्रिणींसह भटकंतीला निघाली जान्हवी कपूर, निसर्गाच्या सानिध्यात घालवतेय वेळ

 

हे देखील वाचा