Wednesday, March 11, 2026
Home मराठी ‘…ताईचा फोटो म्हणजे कोरोनामध्ये सॅनिटायझरचा फवारा’, प्रिया बापटच्या फोटोंवर चाहत्याची लक्षवेधी कमेंट

‘…ताईचा फोटो म्हणजे कोरोनामध्ये सॅनिटायझरचा फवारा’, प्रिया बापटच्या फोटोंवर चाहत्याची लक्षवेधी कमेंट

मराठी चित्रपटसृष्टीतील सध्या आघाडीवर असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये प्रिया बापटचाही समावेश होतो. प्रिया सध्या जोरदार चर्चेत आहे. सोशल मीडियावर तिचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. दररोज तिच्या चाहत्यांसाठी ती न चुकता फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिचे चाहते देखील तिच्या फोटोंना खूप चांगला प्रतिसाद देत असतात. प्रियाने अनेक चित्रपट तसेच नाटकांमध्ये काम करून तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रियाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही साडीमधील फोटो शेअर केले आहेत.

प्रियाने सोशल मीडियावर तिचे वेगवेगळ्या रंगाच्या साड्या घालून फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती गुलाबी, निळ्या, हिरव्या, काळ्या, लाल अशा वेगवेगळ्या रंगाच्या साड्यांमध्ये दिसत आहे. सगळ्या फोटोमध्ये ती खाली बसून पोझ देताना दिसत आहे. (Actress priya bapat share her saree look photos on social media)

हे फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “बैठे बैठे क्या करे, करना है कुछ काम, सुरू करे साडी मॉडेलिंग लेके सावेंची का नाम.” सावेंची हा एक साडीचा ब्रँड आहे. ती या ब्रँडची सहसंस्थापक आहे. तिच्या या फोटोवर तिचे अनेक चाहते प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर “नवरात्रीची तयारी,” अशी कमेंट केली आहे. आणखी एकाने “अगदी इंद्रधनुष्य दिसत आहेस,” अशी कमेंट केली आहे. आणखी एकाने कमेंट केली आहे की, “आला वारा गेला वारा, ताईचा फोटो म्हणजे कोरोनामध्ये सॅनिटायझरचा फवारा.” अशाप्रकारे या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पडताना दिसत आहे.

नाटक, मालिका आणि त्यानंतर चित्रपट अशा अनेक माध्यमांद्वारे, आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री प्रिया बापटने, अगदी कमी कालावधीत आपली खास ओळख निर्माण केली आहे. तिने ‘वजनदार’, ‘टाईमपास २’, ‘लोकमान्य: एक युगपुरूष’, ‘आंधळी कोशिंबीर’, ‘टाइम प्लीज’, ‘काकस्पर्श’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ यांसारख्या चित्रपटात अभिनय करून, लाखो चाहत्यांच्या मनात घर केले आहे. याशिवाय प्रिया संजय दत्त अभिनित ‘लगे रहो मुन्नाभाई’ आणि ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या हिंदी चित्रपटातही दिसली आहे. तसेच उमेशने देखील अनेक चित्रपटात काम केले आहे. तो सध्या ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत मुक्ता बर्वेसोबत काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मार ही डालोगी क्या?’, अमृता खानविलकरच्या बोल्ड अदांवर उमटतायेत चाहत्यांच्या प्रतिक्रिया

-साडीमध्ये खुललंय मराठमोळ्या प्रिया बापटचं सौंदर्य! फोटो शेअर करत म्हणतेय, ‘बैठे बैठे…’

-आनंद गगनात मावेना! तब्बल ‘इतके’ फॉलोव्हर्स पूर्ण झाल्याच्या आनंदात ऋताने शेअर केली खास पोस्ट

हे देखील वाचा