आज मकरसंक्रांती नात्यांमधला कडवटपणा विसरून गोड बोलणे सुरु करण्याचा दिवस. आज संपूर्ण देशामध्ये हा सण साजरा होत आहे. प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या नावाने हा सण साजरा केला जातो. सामान्य लोकांप्रमाणे कलाकारही आज हा सण साजरा करत आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये पतंग उडवण्याची पद्धत आहे. सर्वात जास्त पतंग जरी गुजरातमध्ये उडवली जात असली तरी गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही मोठ्या स्वरूपात पतंग उडवली जाते. आज काल जरी पतंग उडवणायचे प्रमाण कमी असले तरी पूर्वी मात्र मोठ्या प्रमाणावर पतंग उडवली जायची. अभिनेता रितेश देशमुखने आजच्या दिवशी त्याच्या पतंग उडवण्याबाबतच्या काही सुंदर आठवणी फॅन्ससोबत शेयर केल्या आहेत.
रितेश म्हणाला, ” मी लहान असतांना आम्ही मुंबईत समुद्राजवळच्या एका सरकारी बंगल्यात राहायचो. संक्रांतीच्या दिवसांमध्ये मी संध्याकाळी शाळेतून घरी आलो की लगेच गच्चीन जाऊन कापून आलेल्या पतंगी शोधायचो. मी आणि माझे मित्र खूप पतंग उडवायचो, मात्र तेव्हा पतंग उडवण्यापेक्षा कापून आलेल्या पतंगीच्या मागे धावण्यात जास्त मजा यायची. त्यातही जर ती कापून आलेली पतंग आम्हाला मिळाली तर आमचा आनंद गगनात मावायचा नाही. कॉलर ताठ करत पतंग पकडल्याची दवंडी आम्ही पेटायचो.”
“मात्र आजकाल अनेक बदलांमुळे आपल्या येणाऱ्या पिढ्या आपण अनुभवलेल्या ह्या सर्व आनंदांना मुकणार आहेत. आपल्या पारंपरिक सणांची माहिती आपल्यालाच मुलांना करून द्यावी लागणार आहे. सर्वाना जर असे वाटत असेल की आपण जी मजा मस्ती केली ती आपल्या मुलांनी देखील करावी, तर आपल्यालाच त्यांना ह्या सर्व गोष्टींची ओळख करून द्यावी लागणार आहे. त्यासाठीच ह्यावर्षी मी माझ्या मुलांसोबत पतंग उडवणार आहे. सोबतच त्यांना पतंग उडवायला शिकवणार देखील आहे,” असेही तो पुढे म्हणाला.
रितेशच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर रितेश २०१९ मध्ये बागी ३ आणि हाऊसफुल ४ मध्ये महत्वाच्या भूमिका साकारताना दिसला होता.










