Wednesday, February 5, 2025
Home बॉलीवूड सॅनिटरी नॅपकिन्स, औषधांच्या डब्ब्यात चरस घेऊन अटक झालीत लोकं, तर आर्यनने ‘इथे’ लपवले होते अंमली पदार्थ

सॅनिटरी नॅपकिन्स, औषधांच्या डब्ब्यात चरस घेऊन अटक झालीत लोकं, तर आर्यनने ‘इथे’ लपवले होते अंमली पदार्थ

काल दिवसभर चर्चेत असलेल्या मुंबई- गोवा मार्गावरील जहाजामध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाईल अंमली पदार्थांच्या पार्टी प्रकरणामध्ये, बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आणखी आठ जणांना अटक झाल्याची बातमी समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पार्टीमध्ये एनसीबीच्या अधिकार्‍यांना चरससह कोकेन, हशीश, एमडीसारखे अनेक प्रकारचे अंमलीपदार्थ मिळाले आहेत.

शनिवारी मुंबईहून गोव्याला जाणार्‍या जहाजामध्ये रेव्ह पार्टी होत असल्याची कल्पना आधीपासून अंमली पदार्थ विरोधी पथकाला (NCB) च्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या पार्टीमध्ये बड्या हस्तींची मुले, मुली सहभागी होणार होती. नियोजनानुसार साध्या वेषात असलेल्या एनसीबीच्या अधिकार्‍यांनी सहज पार्टीमध्ये प्रवेश मिळवला आणि पार्टी सुरू होण्यापूर्वीच छापा टाकला. या छापेमारीमध्ये केलेल्या कसून चौकशीनंतर, अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. अटकेनंतर तिघांना मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. (aryan khan son of shahrukh khan was carrying drugs here)

दरम्यान अटकेनंतर आर्यन खान स्वतःला निर्दोष असल्याचं सांगत होता. पुन्हा अशा प्रकाराची चूक होणार नाही, अशी ग्वाही दिल्याचही समोर आलं आहे. या चौकशी दरम्यान आर्यनला रडू कोसळलं. तो ढसाढसा रडल्याचही म्हटलं जात आहे. त्यानंतर मात्र आर्यन खानने अंमली पदार्थांचं सेवन केल्याचं कबूल केलं.

समोर आलेल्या माहितीनुसार, आर्यन खानने डोळ्यांच्या लेन्स बॉक्समध्ये अंमली पदार्थ लपवली होती. त्याच वेळी, त्याच्यासोबत उपस्थित लोकांनी सॅनिटरी नॅपकिन्स आणि औषधाच्या बॉक्समध्ये चरस आणि गांजा लपवून ठेवला होता. जहाजाने प्रवास सुरू करताच क्रूझवरील लोकांनी अंमली पदार्थांचे सेवन करण्यास सुरुवात केली आणि एनसीबीने या लोकांना रंगेहाथ पकडले.

या सर्व प्रकारामुळे बॉलिवूड आणि अंमली पदार्थ प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अंमली पदार्थ प्रकरणात आर्यन खानला अटक, किंग खानला भेटण्यासाठी भाईजान पोहोचला ‘मन्नत’ला

-दिशा पटानीने शेअर केला तिचा ‘असा’ दिलकश फोटो, अदा पाहून स्वत:ला रोखू शकला नाही टायगर श्रॉफ

-तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर शेअर केले तिचे वेगवेगळे मूड, फोटो पाहून स्वप्नील जोशी म्हणतोय…

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा