Tuesday, April 7, 2026
Home मराठी मराठी मनोरंजन विश्वातील घरकुलाचे सिंहासनाधिश्वर ‘अरुण सरनाईक’

मराठी मनोरंजन विश्वातील घरकुलाचे सिंहासनाधिश्वर ‘अरुण सरनाईक’

मराठी चित्रपटसृष्टीतील धडाडीचे अभिनेते आणि गायक ज्यांनी त्यांच्या अभिनयाने आणि गायिकीने चाळीसच्या दशकात प्रेक्षकांना वेड लावले होते. ते अभिनेते म्हणजे अरुण सरनाईक होय. सुरुवातीच्या काळात जेव्हा मनोरंजनाची माध्यमे अगदी कमी होती, तेव्हा त्यांनी आख्या महाराष्ट्राचे मनोरंजन केले आहे. त्यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. तसेच अनेक चित्रपटाची गाणी देखील गायली आहेत. सोमवारी (४ ऑक्टोबर) अरुण सरनाईक यांची जयंती आहे. चला तर जाणून घेऊया त्यांचा प्रवास.

अरुण सरनाईक यांचा जन्म ४ ऑक्टोबर १९३५ रोजी झाला. त्यांच्या घरातच कला होती. त्यांचे वडील शंकरराव सरनाईक हे संगीतज्ज्ञ होते. तर त्यांचे काका निवृत्तीबुवा सरनाईक हे प्रख्यात शास्त्रीय गायक होते. त्यामुळे अभिनयात नावारूपास येण्यापूर्वीच त्यांनी पेटी, तबल्यात प्रावीण्य मिळवले होते. संगीताची हिचं आवड त्यांना कलाक्षेत्रातील दारे उघडण्यास उपयोगी ठरली.

 

मुंबईच्या रुईया महाविद्यालयामधून त्यांनी पदवीही मिळवली. त्यानंतर लेखक-दिग्दर्शक अनंत माने यांनी ‘शाहीर परशुराम’ चित्रपटात अरुण यांना एक भूमिका दिली. या भूमिकेपाठोपाठ लेखक-दिग्दर्शक दिनकर द. पाटील यांचा ‘वरदक्षिणा’ आणि दत्ता धर्माधिकारी यांचा ‘विठू माझा लेकुरवाळा’ हा चित्रपटही अरुण यांना मिळाला. त्यानंतर आलेल्या ‘रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटाने किमया केली. त्यांनी भूमिका साकारलेले ‘रंगल्या रात्री अशा’, ‘एक गाव बारा भानगडी’, ‘मुंबईचा जावई’, ‘केला इशारा जाता जाता’, ‘सवाल माझा ऐका’ , ‘सिंहासन’ इत्यादी चित्रपट विशेष गाजले. १ सप्टेंबर १९६४ रोजी ‘अपराध मीच केला’ हे नाटक रंगमंचावर आले होते.
Photo Courtesy: YouTube/ScreenGrab/eagal marathi movies
लेखक अरुण साधू यांच्या ‘सिंहासन’ कादंबरीवर आधारित चित्रपटाची निर्मिती जब्बार पटेल यांनी केली. चित्रपटात सत्तेच्या राजकारणाचे अनेक पैलू बारकाव्याने टिपले आहेत. यात अरुण सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांची साकारलेली व्यक्तिरेखा ही त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील सर्वोच्च ठरली! दिनकर पाटील यांचा ‘वरदक्षिणा’ (१९६२) सारखे सामाजिक, अनंत मानेंचा ‘एक गाव बारा भानगडी’ (१९६८), ‘गणाने घुंगरू हरवले’ (१९७०) सारखे ग्रामीण तर ‘घरकुल’ (१९७०) सारखे शहरी चित्रपटांतील त्यांच्या भूमिका वैशिष्ठ्यपूर्ण ठरल्या!
Photo Courtesy: YouTube/ScreenGrab/eagal marathi movies
गायक घराण्यातून आल्याने त्यांनी काही चित्रपटांतून गाणीही गायली. अभिनयातील व्यस्तता एकीकडे कायम ठेवत सरनाईकांनी आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेला छेद दिला नाही. चित्रीकरणातून वेळ मिळाला की, कुष्ठरुग्णांसाठी काम करणार्‍या ‘आनंदग्राम’मध्ये ते स्वतःला झोकून द्यायचे. तिथे खर्‍या अर्थाने ते रमले. तिथल्या आबालवृद्धांच्या हाती फळे, खाऊ देताना त्यांच्या चेहर्‍यावरून आनंद ओसंडून वाहायचा. अशा या महान अभिनेत्याचे २१ जून १९८४ रोजी निधन झाले. त्यांचे सगळे चित्रपट आणि नाटक अजरामर झाले आहेत.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अंमली पदार्थ प्रकरणात आर्यन खानला अटक, किंग खानला भेटण्यासाठी भाईजान पोहोचला ‘मन्नत’ला

-दिशा पटानीने शेअर केला तिचा ‘असा’ दिलकश फोटो, अदा पाहून स्वत:ला रोखू शकला नाही टायगर श्रॉफ

-तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर शेअर केले तिचे वेगवेगळे मूड, फोटो पाहून स्वप्नील जोशी म्हणतोय…

हे देखील वाचा