Monday, October 5, 2026
Home › अन्य › किश्वर मर्चंट अन् सुयश रायने शेअर केली त्यांच्या बाळाची पहिली झलक, गोंडस चेहरा पाहून हरपेल तुमचही भान

किश्वर मर्चंट अन् सुयश रायने शेअर केली त्यांच्या बाळाची पहिली झलक, गोंडस चेहरा पाहून हरपेल तुमचही भान

यावर्षी अनेक अभिनेत्रींना मातृत्व लाभलं आहे. याच्यात करीना कपूर खानपासून ते अनुष्का शर्मापर्यंत अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे. यातच छोट्या पडद्यावरील अभिनेत्री किश्वर मर्चंट देखील सामील आहे. बऱ्याचदा कलाकार मंडळी आपल्या मुलांना कॅमेरा आणि सोशल मीडियापासून दूर ठेवणे पसंत करतात. मात्र किश्वर मर्चंट आणि सुयश राय या जोडप्याने त्यांचा मुलगा निर्वैरची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. किश्वर आणि सुयश दोघांनी एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आणि निर्वैरचा चेहरा दाखवला.

व्हिडिओच्या सुरुवातीला एक गोंडस खेळणं दिसतं. त्यानंतर चुटकी वाजवताच निर्वैर दिसतो. डोक्यावर गोंडस राखाडी रंगाची पगडीसोबत, तो इतका गोंडस दिसत आहे की, कोणीही त्याच्याकडे पाहतच राहील. बाळाच्या टी-शर्टवर लिहिले आहे, ‘आय लव्ह माय बाबा आणि मम्मा.’ या व्हिडिओमध्ये निर्वैर खेळताना दिसत आहे. (kishwer merchant and suyyash rai first time reveal their son nirvair face)

निर्वैरच्या पहिल्या झलकचा हा व्हिडिओ खूप पसंत केला जात आहे. टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी त्यांचे अभिनंदन केले आणि मुलासाठी प्रेम व्यक्त केले आहे. अभिनेत्री गौहर खानने लिहिले, “माशाअल्लाह, खूप गोंडस.” तर बरखा सेन गुप्ताने लिहिलं आहे की, “अरे देवा किती गोड पमकीन आहे, आशीर्वाद.” बाळाचा गोंडसपणा पाहून चाहतेदेखील स्वतःला रोखू शकले नाहीत आणि त्यांनीही भरभरून त्यांचे प्रेम व्यक्त केले आहे.

https://www.instagram.com/p/CUJ0VaCozRf/?utm_source=ig_web_copy_link

किश्वर आणि सुयश नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या मुलाच्या जन्माची माहितीही दिली होती. पण त्यांनी मुलाचा चेहरा कधीच मीडियासमोर दाखवला नव्हता.

किश्वर आणि सुयश यांची भेट २०११ मध्ये एका मालिकेच्या शूटिंग दरम्यान झाली होती. दोघांनी ‘बिग बॉस ९’मध्ये एकत्र भाग घेतला होता. यानंतर १५ डिसेंबर २०१६ रोजी दोघांनी लग्न केले. तर यावर्षी २७ ऑगस्ट हे दोघे आई वडील बनले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूडला ‘राम राम’ ठोकल्यानंतर, ‘दंगल गर्ल’ झायरा वसीमने प्रथमच शेअर केला तिचा फोटो

-शूटिंगच्या पहिल्याच दिवशी संजय मिश्रा यांनी दिले होते २८ टेक, अखेर कंटाळून दिग्दर्शकाने केलं ‘हे’ काम

-‘कसं काय पावनं बरं हाय का?’ मृण्मयीने शेअर केला आदिनाथसोबतचा दिलखेचक फोटो

हे देखील वाचा