Monday, March 2, 2026
Home अन्य ‘बिग बॉस १५’मध्ये सलमान खानने घेतली प्रतीक सहजपालची शाळा, म्हणाला ‘माझी आई बहीण असती तर…’

‘बिग बॉस १५’मध्ये सलमान खानने घेतली प्रतीक सहजपालची शाळा, म्हणाला ‘माझी आई बहीण असती तर…’

टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय शो ‘बिग बॉस १५’ ला सुरुवात झाली आहे. शनिवारी (९ ऑक्टोबर) या शोचा पहिला वीकेंडचा वार टेलिकास्ट केला जाणार आहे. या आधीच चॅनलने एक प्रोमो शेअर केला आहे. जो पाहून हे समजत आहे की, सलमान खान या वेळी खूप रागात आहे. या वेळी सलमान खानचा सगळा राग प्रतीक सहजपालवर निघणार आहे. विधी आणि प्रतीकमध्ये झालेल्या गोष्टीवरून सलमान खान खूप नाराज झाला आहे.

बिग बॉसच्या नवीन प्रोमोमध्ये या शोचा होस्ट सलमान खान प्रतीकची चांगलीच शाळा घेताना दिसत आहे. सलमान त्याला म्हणतो की, “विधीने जर मनात आणले असते, तर तुझे चांगलेच धिंडवडे काढले असते.” (Bigg boss 15 weekend ka vaar, salman khan slams pratik sehajpal for the bathroom incident with Nidhi pandya)

झालं असं की, मागच्या एपिसोडमध्ये प्रतीकने जंगलातील लोकांच्या बाथरुमचे लॉक तोडले होते. मात्र, नेमकी त्या वेळी विधी अंघोळ करत होती. त्याने केलेल्या या कृत्याबद्दल घरातील इतर सदस्य देखील त्याला खूप बोलले. परंतु तरी देखील प्रतीकला त्याच्या चुकीची जाणीव झाली नाही. परंतु आता सलमान त्याची चांगलीच शाळा घेताना दिसणार आहे. तो म्हणतो की, “तू म्हणत होता की, जर बाथरूममध्ये माझी आई किंवा बहीण असली असती, तरी देखील गेमसाठी मी हे सगळं केलं असतं.”

प्रोमोमध्ये सलमान खान प्रतीकला रागात म्हणतो की, “हा गेम आई किंवा बहिणीपेक्षा जास्त मोठा आहे का? जर माझी बहीण असती, तर माझ्या हातून काही चुकीचं घडलं असतं.” हा प्रोमो पाहिल्यानंतर त्याच्या फॅन्समध्ये त्याच्याबाबत सहानभूती निर्माण झाली आहे. सगळेजण पोस्ट करून अशी प्रार्थना करत आहेत की, या नंतर प्रतीक खचून नाही गेला पाहिजे.

नवरात्रीमध्ये बिग बॉसचे पूर्व स्पर्धक, राखी सावंत, राहुल वैद्य, निक्की तांबोळी आणि नेहा भसीन हे या शोमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आता येणारा आठवडा चांगलाच रंगतदार असणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-विद्युत गर्लफ्रेंडसोबत करणार हटके लग्न; ‘वेडिंग प्लॅन’बद्दल म्हणाला, ‘आम्ही १०० पाहुण्यांसह स्कायडायव्हिंग…’

-KBC: ‘बिग बींमुळेच झालंय जिनिलियासोबत लग्न…’, रितेश देशमुखने केला मोठा खुलासा

-आर्यन खानच्या प्रकरणावर अभिनेत्री तापसी पन्नूची महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया; म्हणाली, ‘स्टार फॅमिली असेल तर…’

हे देखील वाचा