Wednesday, March 25, 2026
Home बॉलीवूड आनंद गगनात मावेना! दिवंगत सिद्धार्थ शुक्लाला ‘ब्रोकन बट ब्युटीफुल ३’ वेबसीरिजसाठी मिळाला ‘हा’ पुरस्कार

आनंद गगनात मावेना! दिवंगत सिद्धार्थ शुक्लाला ‘ब्रोकन बट ब्युटीफुल ३’ वेबसीरिजसाठी मिळाला ‘हा’ पुरस्कार

या वर्षी सिनेसृष्टीतून जितक्या चांगल्या बातम्या आल्या आहेत, तितक्यात दुःखद बातम्या देखील समोर आल्या आहेत. यातील सगळ्यांचेच हृदय तोडणारी आणि अत्यंत अनपेक्षित घडलेली घटना म्हणजे बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचा मृत्यू. त्याच्या मृत्यूने संपूर्ण देश हादरला होता. आता कुठे अनेकजण या धक्क्यातून बाहेर आले आहेत. अशातच दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला ‘ब्रोकन बट ब्युटीफुल ३’ या वेब सीरिजमधील त्याच्या कामासाठी सन्मानित करण्यात आले आहे.

त्याला स्क्रीनएक्सने वेबसीरिजसाठी पुरुष या कॅटेगरीमध्ये लोकप्रिय अभिनेता म्हणून पुरस्कार दिला आहे. त्याचे चाहते ही बातमी ऐकल्यानंतर खूप खुश झाले आहेत. सगळेजण वेगवेगळ्या पोस्ट करून त्यांचे प्रेम व्यक्त करत आहेत. ही वेबसीरिज एका कॉम्प्लेक्स पुरुषाची आहे. जो प्रेम आणि त्याच्या संबंधित गोष्टींसोबत फसला आहे. एकता कपूरने या वेबसीरिजची निर्मिती केली होती. (Sidharth shukla receives popular actor award for broken but beautiful 3 web series)

स्टार फोटोग्राफर व्हायरल भयानीने सिद्धार्थचा एक फोटो शेअर करून या पुरस्काराबाबत माहिती दिली आहे. हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “लोकप्रिय अभिनेत्याचा पुरस्कार जिंकल्यामुळे सिद्धार्थ‌ शुक्लाला‌ खूप शुभेच्छा.” त्याला हा अवॉर्ड अगस्त्य रावचे पात्र निभावल्यामुळे मिळाला आहे. या पोस्टवर ८२ हजारांपेक्षाही जास्त लाईक्स आल्या आहेत. तसेच अनेकजण या फोटोवर कमेंट्स करत आहेत.

‘सिडहार्टस्’च्या नावाने लोकप्रिय असणाऱ्या सिद्धार्थ शुक्लाचे चाहते या बातमीमुळे खूप खुश झाले आहेत. त्याच्या एका चाहत्याने “अभिनंदन,” अशी कमेंट केली आहे. आणखी एकाने “मला तुझा खूप अभिमान वाटत आहे,” अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या एकाने कमेंट केली आहे की, “एक शानदार व्यक्तिमत्त्व जे नेहमीच लाखोंच्या हृदयात राहणार आहे.” अशाप्रकारे या पोस्टवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दहावी पास होताच मिळाले चित्रपटात काम करण्याचे बक्षीस, ‘या’ कारणामुळे नाव बदलून फिरत होती श्रृती मराठे

-विद्युत गर्लफ्रेंडसोबत करणार हटके लग्न; ‘वेडिंग प्लॅन’बद्दल म्हणाला, ‘आम्ही १०० पाहुण्यांसह स्कायडायव्हिंग…’

-KBC: ‘बिग बींमुळेच झालंय जिनिलियासोबत लग्न…’, रितेश देशमुखने केला मोठा खुलासा

हे देखील वाचा