संपूर्ण भारतात गुरुवारी (७ ऑक्टोबर) घटस्थापना झाली आहे. या वर्षी नवरात्रीचा सण देखील उत्साहात साजरा होणार आहे. स्त्री-शक्तीचा आदर आणि जागर करण्यासाठी नवरात्र हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा होतो. या नवरात्रीतील नऊ दिवसांचे एक महत्व आहे. दुर्गामातेला प्रत्येक दिवसाच्या रंगाप्रमाणे वस्त्र घातले जातात. चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री देखील हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करत आहेत. अनेक अभिनेत्रींनी सहाव्या दिवशी निळ्या रंगाची वस्त्र परिधान करून फोटो शेअर केले आहेत. अशातच मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने देखील निळ्या रंगाची साडी नेसून सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
ऋतुजाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकता की, तिने निळ्या रंगाची एक सुंदर साडी परिधान केली आहे. यावर तिने सोनेरी रंगाची ज्वेलरी परिधान केली आहे. ती या साडीसोबत वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. तसेच कपाळी निळ्या रंगाची टिकली लावली आहे. फोटोमध्ये ती नेहमी प्रमाणेच खूप सुंदर दिसत आहे. (Marathi actress Rutuja bagwe share her blue saree photos on social media)
तिच्या या फोटोवर अनेक चाहते जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “तू आणि तुझं हसणं आणि तुझं सुंदर दिसणं. मी आणि माझं तुला पाहणं. हाय ऋतुजा लग्न करशील का माझ्याशी?” आणखी एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “किती ते नखरे.” यासोबत आणखी एक चाहता म्हणतोय की, “रूप देखणे बघून नयन हे सुखावले.”
ऋतुजा बागवे ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिका तसेच चित्रपटात काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. खास करून तिने टेलिव्हिजनवरील संस्कारी मुलीची पात्रं निभावली आहेत. तिने ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘मंगळसूत्र’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘तू माझा सांगाती’, ‘नांदा सौख्यभरे’, ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तिने ‘रिस्पेक्ट’ आणि ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटात देखील काम केले आहे. सध्या ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खूप चर्चेत असते.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘या’ दिवशी होणार झी मराठी पुरस्कार सोहळा साजरा, प्रिया मराठेने व्हिडिओ शेअर करून दाखवली डान्सची झलक
-सोनाली कुलकर्णीचा ‘शटर’ चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर