Sunday, June 22, 2025
Home मराठी ‘नक्की कोणाकडे बघायचं, दोघी सुंदर दिसताय…’, सोनाली अन् अमृताच्या डान्सवर चाहत्याची लक्षवेधी कमेंट

‘नक्की कोणाकडे बघायचं, दोघी सुंदर दिसताय…’, सोनाली अन् अमृताच्या डान्सवर चाहत्याची लक्षवेधी कमेंट

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर ही अभिनयासोबत तिच्या डान्समुळे देखील सर्वत्र चर्चेत आहे. तिच्या मनमोहक नृत्याविष्काराने ती नेहमीच सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असते. ‘नटरंग’ या चित्रपटातील तिच्या ‘वाजले की बारा’ या लावणीने तर आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले होते. सोशल मीडियावर देखील अनेकवेळा ती तिचे डान्स व्हिडिओ शेअर करत असते. अशातच तिचा आणि सोनाली खरे यांचा एक झक्कास डान्स व्हिडिओ समोर आला आहे.

अमृताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सोनाली आणि अमृता ‘बडी मुश्किल’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्या दोघीही अत्यंत सुंदर आणि मराठमोळ्या अंदाजात दिसत आहेत. (Actress sonali khare and amrita Khanvilkar’s dance video viral on social)

व्हिडिओमध्ये अमृताने पिवळ्या रंगाची, तर सोनालीने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. दोघींनीही नाकात नथ घातली आहे. तसेच दोघींनीही कर्ली हेअर केले आहेत. त्यांच्या डान्स सोबत त्या दोघींचा हा एकसारखा लूक देखील चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

त्यांचा हा व्हिडिओ सर्वांना खूप आवडला आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा नुसता वर्षाव चालू आहे. या व्हिडिओवर सुबोध भावे याने कमेंट केली आहे. तिच्या एका चाहतीने देखील या व्हिडिओवर कमेंट केली आहे की, “नक्की कोणाकडे बघायचं, दोघी सुंदर दिसताय आणि नाचताय.” आणखी एकाने “भारी झालंय हे,” अशी कमेंट केली आहे.

तिने ‘गोलमाल’ या मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. यानंतर ती बऱ्याच चित्रपटात पाहायला मिळाली. इतकेच नव्हे, तर तिने हिंदी चित्रपटातही बऱ्याच महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीचा ‘वेल डन बेबी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. यात तिच्यासोबत पुष्कर जोग आणि वंदना गुप्ते हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. याशिवाय लवकरच ती ‘पॉंडीचेरी’ या मराठी चित्रपटातही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ दिवशी होणार झी मराठी पुरस्कार सोहळा साजरा, प्रिया मराठेने व्हिडिओ शेअर करून दाखवली डान्सची झलक

-सोनाली कुलकर्णीचा ‘शटर’ चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर

-‘…मी माथा टेकवून त्यांची माफी मागते’, म्हणत शिवलीला पाटील यांनी मागितली सांप्रदायिक क्षेत्रातील व्यक्तींची माफी

हे देखील वाचा