बॉलिवूडपासून बराच काळ लांब असणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या चित्रपटांमध्ये कमी आणि इतर कार्यक्रमांमध्ये जास्त दिसते. निक जोनससोबत विवाह बंधनात अडकल्यानंतर ती अमेरिकेत रहायला गेली होती. अमेरिकेन टीव्ही शोमध्ये ती काम करत असल्याची माहिती समोर आली होती. मागील काही दिवसांपासून प्रियांका तिच्या आईसोबत स्पेनला सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. प्रियांकाने तिच्या या सुट्ट्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. नुकताच स्पेनच्या रस्त्यावर फिरत असतानाच एक फोटो प्रियांकाने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मात्र, या फोटोसोबत तिने जो मजकूर शेअर केला आहे, तो वाचून सर्वांचाच गोंधळ उडाला आहे.
प्रियांका चोप्रा बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. बॉलिवूडसोबतच हॉलिवूडची गाजवणारी प्रियांका सतत या ना त्या कारणाने चर्चेत असते. बहुतकरून इंटरनॅशनल प्रोजेक्ट्समध्ये काम करणारी प्रियांका परदेशातच राहत आहे. प्रियांका सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. पती निक सोबतचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच प्रियांका चोप्राने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन स्पेनच्या रस्त्यावर फिरतानाचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये प्रियांका एका खांबाला टेकून उभी असल्याचे दिसत आहे, या फोटोमध्ये प्रियांकाचा चेहरा खूपच उदास दिसत असून, फोटोसोबत प्रियांकाने लिहिले, “अगर आप आगे बढ नहीं रहे है, तो आप पिछे गिर जाते है.”
प्रियांकाच्या या उदास फोटोंमुळे चाहते मात्र विचारात पडले आहेत. या फोटोवर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी प्रियांकाला निराश असण्याचे कारण विचारले आहे. एका युजरने लिहिले, ‘इतकी का उदास आहेस’ तर आणखी एकाने लिहिले, ‘काय झालं प्रियांकाजी.’ प्रियांका सध्या स्पेन मध्ये तिच्या आगामी’ ‘सिटाडेल’ या वेबसिरीजचे शूटिंग करत आहे.
दरम्यान, प्रियांका चोप्रा ही हिंदी चित्रपट जगतातील यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मिस वर्ल्डचा किताब पटकावलेल्या प्रियंकाने अनेक इंटरनॅशनल नॅशनल चित्रपटांमध्ये काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सैफ अली खानने तैमूरबद्दल केला खुलासा म्हणाला, ‘जेहच्या जन्मानंतर तैमूर अधिक…’

 
                                    








