Monday, October 5, 2026
Home › मराठी › सायली संजीवचे साडीतील फोटो पाहून चाहत्याने घातली थेट लग्नाची मागणी, म्हणाला…

सायली संजीवचे साडीतील फोटो पाहून चाहत्याने घातली थेट लग्नाची मागणी, म्हणाला…

छोट्या पडद्यावरून चित्रपटात पदार्पण करण्यासाठी कलाकारांना अनेक वर्ष मेहनत करावी लागते. अभिनयाच्या कसोटीला उतरावे लागते. पण काही अभिनेत्री अशा असतात की, त्या खूप कमी कालावधीत त्यांचा हा टप्पा पार करतात. याच यादीतील एक नाव म्हणजे सायली संजीव. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीने आता चित्रपटसृष्टीत तिचे एक अढळ स्थान निर्माण केले आहे. तिच्या अभिनयासोबत तिच्या सौंदर्याचे नेहमीच कौतुक होत असते. सोशल मीडियावर ती चाहत्यांशी जोडून असते. अशातच तिचे साडीमधील काही फोटो समोर आले आहेत.

सायलीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने फिकट निळ्या रंगाची प्लेन साडी नेसली आहे. यावर तिने गडद निळ्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाउज घातला आहे. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिने कोणताही जास्त मेकअप केला नाही. तिने केवळ नाकात नोजरिंग घातलेली दिसत आहे. तसेच सगळे केस मोकळे सोडले आहे. तिचा हा लूक सगळ्यांना खूपच आवडला आहे. (marathi actress sayali sanjeev share her photos on social media)

तिचे अनेक चाहते या फोटोवर कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. यासोबत सोनाली खरे हिने “प्रिटी यू” अशी कमेंट केली आहे तर अन्विता फलटणकर हिने देखील कमेंट केली आहे. तिचे चाहते तर या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडताना दिसत आहेत. तिच्या एका चाहत्याने तिच्या साडीचे आणि नोझरिंगचे कौतुक केले आहे, तर दुसरा एक चाहता तिला “गायकवाड बाई” असे म्हणत आहे. तर आणखी एका चाहत्याने “सायली वहिनी” अशी कमेंट केली आहे. यासोबत आणखी एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “सायली माझ्याशी लग्न करशील का? पाच वर्षांपासून तुझ्या प्रेमात पडलो आहे.”

काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेटर ऋतुराज गायकवाड आणि सायली संजीव हे दोघे ही सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्ट लाईक करून कमेंट देखील करत होते. त्यामुळे ते दोघे रिलेशनमध्ये आहे अशा जोरदार चर्चा चालू होत्या.

सायलीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ‘काहे दिया परदेस’ मालिकेत सायलीने गौरीची भूमिका साकारली होती. गौरीची भूमिका साकारत, अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. त्यानंतर अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीही पाऊल ठेवले. तिने ‘पोलीस लाईन’, ‘आटपाडी नाईट्स’, ‘मन फकीरा’, ‘सातारचा सलमान’, ‘एबी आणि सीडी’, ‘झिम्मा’, ‘गोष्ट एका पैठणीची’ अशा मराठी चित्रपटामध्ये अभिनय करून रसिकांची मने जिंकली आहे. सायलीने कलर्स मराठीवरील ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेत सुयश टिळकसोबत काम केले आहे. या मालिकेने नुकतेच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुझी माझी जोडी जमली’, गाण्यावर मानसीने पतीसोबत धरला ठेका; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लय भारी’

-पिवळ्या रंगाच्या साडीत मितालीने दिल्या झक्कास पोझ; चाहताही म्हणाला, ‘खूप खूप जास्त सुंदर दिसताय’

-‘…खरचं साडीपेक्षा तू जास्त सुंदर दिसतेस’, श्रुती मराठेच्या फोटोवरील चाहत्यांची कमेंट ठरतेय लक्षवेधी

हे देखील वाचा